
Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम आणि मतदारयादीबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले. अनेकांनी कोर्टाच्या पायऱ्या देखील चढल्या. मात्र, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये (Local Body Elections) याच विधानसभेला वापरण्यात आलेल्या याद्यांचा वापर करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्येष्ठ कायदे अभ्यासक असीम सरोदे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांमध्ये घ्या अशा सूचना निवडणूक आयोगाला दिल्या होत्या. त्यानुसार या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
याचाच भाग म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या याद्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आल्या त्याच याद्यांचा वापर करण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) ज्या मतदार याद्या वापरण्यात आल्या त्या याद्या ,बोगस स्वरूपाच्या होत्या. चुकीच्या पद्धतीने त्या तयार करण्यात आल्या होत्या. आणि त्याच याद्यांच्या आधारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्यास ही लोकशाहीची एक प्रकारे फसवणूक असेल असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मोठ्या प्रमाणात होणार आहेत. यामध्ये 29 महापालिका तर 232 नगरपालिका आणि 125 नगरपंचायत असणार आहेत. म्हणजे एकूण विचार केल्यास 386 इतक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या व्यापक निवडणुका असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले. जे राजकीय पक्ष, जे उमेदवार निवडून येणार नाही असं वाटत होतं आणि तसं वातावरण देखील होतं. ते निवडून आले आणि ते च्या याद्यांच्या आधारे निवडून आले आहेत. त्यामुळे या संशयास्पद असलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्याचा डाव आखण्यात येत आहे असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.
मतदारयादी या निवडणुकीसाठी अद्यायावत असणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सात ते आठ लाख नव मतदार वाढले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर जुन्याची याद्या वापरण्यात आल्या तर या सगळ्या नव मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे या विधानसभेतील मतदारा याद्या वापरण्यास आमचा विरोध असणारा असून आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे देखील असीम सरोदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.