३० वर्ष सापाच्या पिल्लाला दुध पाजलं या उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर फडणविस म्हणाले, ते अत्यंत निराश आहेत, हताश आहेत. मलिक प्रकरणावर काय उत्तर द्यावं हे समजत नसल्याने ते असे बोलत आहेत. याशिवाय ही युती उद्धव ठाकरे यांनी केली नव्हती. ती बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे त्यांची देखील हेच मत होतं का? याचा विचार करावा असेही आव्हान फडणविस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
जी शिवसेना दाऊदचं नाव घेतल्यानंतर आक्रमक होत होती, तिच शिवसेना दाऊदशी व्यवहार केल्याचं समोर आल्यानंतर देखील मलिक यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे का करतात? असा कोणाचा दवाब होता? मुंबईचे अपराधी आहेत. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप शांत होणार नसल्याचेही फडणविस यांनी सांगितले. त्यामुळेच आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान देखील हिच मागणी करत होतो, असे त्यांनी सांगितले. तसेच सरकार चालवण्यासाठी कोणत्या स्तराला गेलेत हे कळून येते, अशीही टीका फडणविस यांनी केली. (Devendra Fadnavis News Updates)
संजय राठोड तुरुंगात गेले नव्हते, पण त्यांचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला. पण इथे नवाब मलिक तर थेट तुरुंगातच आहेत. मग त्यांचा राजीनामा का नाही? त्यांना वाचवण्याचं कारण काय? त्यांच्या मागे कोण आहे? कोणाच्या दबावात त्यांना वाचवलं जात आहे? असाही सवाल फडणविस यांनी महाविकास आघाडीला केला. (Latest Political News in Marathi)
पुढे बोलताना फडणविस म्हणाले, दाऊदची बहिण हसिना पारकर हिला कब्जा मिळवून दिल्याबद्दल ५५ लाख रुपये दिले. हे पैसे कुठे वापरले गेले? त्यानंतर ३ बॉम्बस्फोट घडले. हे पैसे मुंबई, भारत अस्थिर आणि असुरक्षित करण्याकरिता वापरला गेला. त्यानंतर देखील जर मंत्र्यांना जर पाठीशी घातले जात असले तर ते गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे हे सरकार दाऊद समर्पित सरकार आहे, असा आरोपही फडणविस यांनी केला.
इतिहासात पहिल्यांदा एखादे मंत्री तुरुंगात असून देखील त्यांचा राजीनामा घेतला जात नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती आहे. त्यांच्यावर आरोप देखील साधे नाहीत. दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे. सरळ सरळ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन कवडीमोल भावाने विकत घेतली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर बोलताना केला.
विरोधकांच्या प्रचंड गोंधळामुळे अधिवेशनाचे विधानसभेतील कामकाज आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे.
फडणविसांचे भाषण थांबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाची कार्यवाही सुरु केली. राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवले. शुक्रवारी आणि शनिवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार भाषण होणार.
भाजपची नबाव मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी. राजीनाम्याची मागणी. सभागृहात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेतला असता. हसिना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचा फडणविसांचा आरोप.
राज्यपालांना त्यांच्या शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावर माफी मागवीच लागेल. तसेच त्यांना परत पाठवण्याचा प्रस्ताव आणण्यावर विचार सुरु असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दरम्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी सुरु आहे.
सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारची, भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका. तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचाही भाजपचा इशारा.
राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सभागृहात गोंधळ; भाषण थांबवलं. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध करत सभागृह आक्रमक. राज्यपाल सभागृह परिसरातून निघून गेले. कदाचित राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल यांनी अभिभाषण केवळ ५ मिनिटात संपवले आणि सभागृह सोडले.
राज्यपालांचे अभिभाषण सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृह परिसरात दाखल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ते सभागृहाकडे रवाना झाले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सभागृह परिसरात दाखल
आज अधिवेशाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजप मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे. भाजपच्या आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवरच डॉन दाऊद इब्राहिम आणि नवाब मलिक यांचा फोटो असलेल्या बॅनरसह आंदोलन केले. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
दरम्यान राज्यपाल भगतिंसग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session 2022) आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा मुद्दा, किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय, मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा अशा मुद्द्यांसह विरोधक अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार यात शंका नाही.
अशातच सरकार-विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार आहे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमची टीम तयार आहे, असे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहापानाच्या वेळेस माध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर या अधिवेशनात ते प्रथमच सर्वांसमोर येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.