
Vidhan Sabha Adhiveshan 2025 :राज्याचा अर्थंसंकल्प अजित पवार मांडत आहेत. सरकारने केलेल्या गुंतवणुकीबाबत त्यांनी आढावा घेतला. राज्याला वस्त्रोउद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करणार, असे अजित पवार यांनी जाहीर केले. उद्योगांच्या परवान्यासाठी उद्योजकांसाठी मैत्री या वेबपोर्टलचा वापर करण्यात येणार आहे.
वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे.
अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक वाढत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.गुंतवणूक-रोजगार निर्मिती-वाढीव उत्पन्न- मागणी-गुंतवणूक असे विकासचक्र फिरते राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढवण बंदराजवळ तिसरं विमानतळ उभारण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांसाठी विक्रमी गुंतवणूक करणार आहे.
विकसित राष्ट्र संकल्प सिद्धिस नेण्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यासाठी सर्वसमावेशक रुपरेषा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असे ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण, महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात ‘वाढवण बंदर’ विकसित करण्यात येणार आहे.
प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य सरकाचा सहभाग 26 टक्के आहे.
वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे.
जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे. सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे.
बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार आहे.
बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी बारा प्रियजणांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो… पुन्हा आलो… अशी सुरवात अजितदादांनी अर्थसंकल्प मांडताना केली. अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची मला संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे अजितदादा म्हणाले.
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र हवामान केंद्र
घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून 50 हजारांची वाढ करण्यात आली आहे.
घरकुल योजनेतील घरांच्या छतावर सौर उर्जा केंद्र बसविणार येणार आहे.
सौर कृषी पंपाची संख्या वाढवणार, सध्या दरदिवशी 1 हजार पंप बसविले जात आहेत.
राज्यात बांबू उत्पादक क्षेत्र वाढवणार,
4300 कोटींचा प्रकल्प नियोजित
कृषी संजीवनी योजना 21 जिल्ह्यांमध्ये राबवणार
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांतमध्ये कामे सुरू
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.