Amit shah : अमित शाहांच्या 'गुजरात पॅटर्न'ने वाढवले भाजप आमदारांचे टेन्शन; फिक्स तिकीट कापणार

Amit shah Assembly election bjp Devendra Fadnavis : अमित शाह यांनी सांगितले की ते आमदारकीसाठी इच्छुक असताना त्यांचे देखील तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे तिकीट कापले तरी नाराज होऊ नका कारण तुमची नाराजी दूर करायला तुमच्या घरी कोणीही येणार नाही.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah News : भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. भाजपची सत्ता परत आणायची असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना रोखायचे, असा निर्धार अमित शाह यांनी बोलून दाखवला. पुन्हा सत्तेत येण्यासाठी शाहा यांनी 'गुजरात पॅटर्न' राबवण्याचे संकेत दिले आहे.

अमित शाह यांच्या संकेतेनंतर कमीत कमी भाजपच्या 50 आमदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत 99 पैकी 58 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. तो पॅटर्न महाराष्ट्रात देखील राबवला जाऊ शकतो. अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यात सांगितले की ते आमदारकीसाठी इच्छुक असताना त्यांचे देखील तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे तिकीट कापले तरी नाराज होऊ नका कारण तुमची नाराजी दूर करायला तुमच्या घरी कोणीही येणार नाही.

Amit Shah
Sushma Andhare Vs Dhananjay Munde : सुषमा अंधारेंनी मुंडे भावंडांसमोर टाकलीय 'राजकीय गुगली'

अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यातून एकप्रकारे विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार असल्याचे संकेत दिल्याने अनेक आमदार चिंतेत आहेत. भाजप अंतर्गत सर्व्हे करून आमदारांच्या कामगिरीची कशी आहे याची दखल घेत असते त्यामुळे समाधानकारक कामगिरी नसलेल्या आमदारांना नारळ मिळणार हे फिक्स समजले जात आहे.

विदर्भावर विशेष लक्ष

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 पैकी महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला होता. तर, भाजपला दोन आणि शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली होती. विदर्भ हा भाजपचा गड समजला जातो. त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यात अधिकाधिक यश मिळवण्यासाठी भाजपने विदर्भावर विशेष लक्ष केंद्रीत केले असून 62 पैकी 45 जागा जिंकण्याचे टार्गेट अमित शाहांनी दिले आहे.

Amit Shah
Amit Shah: 'गळती' रोखण्याचं चॅलेंज अन् 'फोडाफोडी'चा सल्ला; अमित शाहांची नेमकी 'स्ट्रॅटेजी' काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com