Sushma Andhare Vs Dhananjay Munde : सुषमा अंधारेंनी मुंडे भावंडांसमोर टाकलीय 'राजकीय गुगली'

Sushma Andhare made a political move against Minister Dhananjay Munde from Parali Assembly Constituency : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मंत्री धनंजय मुंडे यांना बहिणीविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
Sushma Andhare 1
Sushma Andhare 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघाविषयी मुंडे भावंडांमध्ये राजकीय गुगली टाकली. लाडकी बहीण योजनेचा आधार घेत मंत्री धनंजय मुंडे यांना राजकीय कोपरखळी लगावली असून, त्याचे काय पडसाद उमटतात, याकडं लक्ष लागलं आहे.

'मंत्री धनंजय मुंडे यांचे आपल्या बहिणींवर प्रचंड प्रेम करतात. त्या प्रेमापोटी ते प्रीतमताईंसाठी सहज परळीची जागा सोडून देतील', असे म्हणत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंडे भावंडांसमोर राजकीय गुगली टाकली आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय गणित फिस्कटत आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी महायुतीतील मित्रपक्षांकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. यातच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये पटत नाही. भाजपचा कार्यकर्ता संभ्रमात असून भाजप नेते मुंडे भगिनींनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष होत चाललं आहे. परळीमधील भाजपच्या जुन्या आणि नवीन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मध्यंतरी बैठक घेऊन, या नाराजीला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे परळी मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष वाढू लागला आहे.

Sushma Andhare 1
Bajrang Sonwane News : बीडचे खासदार बजरंग सोनवणे अडचणीत ? कोर्टात याचिका दाखल; 'हे' आहे कारण

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील (BJP) संघर्षातील नाराजीवर शिवसेनेच्या उपनेत्या. सुषमा अंधारे यांनी मीठ शिंपडलं आहे. यासाठी त्यांनी लाकडी बहीण योजनेचा आधार घेतला आहे. "अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यामुळे सर्व नेत्यांना बहिणींबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे. सर्व नेत्यांना बहिणीबद्दील किती प्रेम आहे, किती त्याग करून शकतो, हे दाखण्याची मोठी संधी यानिमित्ताने निर्माण झाली आहे", असं म्हणत सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधत मुंडे भावंडांसमोर राजकीय गुगली टाकली आहे.

Sushma Andhare 1
Ex MLA Car Accident : माजी आमदाराच्या कारचा सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, म्हशीचा जागीच मृत्यू अन्...

अजितदादांनी संधी गमावली...

सुषमा अंधारे म्हणाल्या, "बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नामदार धनंजय मुंडे आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम करतात. त्या प्रेमापोटी ते प्रीतमताईंसाठी सहज परळीची जागा सोडून देतील. अजितदादांनी बारामतीत बहिणीबद्दल ती संधी गमावली, त्यांनी चुकुन उमेदवार उभा केला होता. पण यांना चूक सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे धनंजय मुंडे देखील, ती संधी घेतील आणि प्रीतमताईंना उभे करतील".

परळीची जागा शरद पवारांकडे...

'परळी विधानसभेची जागा आम्ही मागितलेली नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातील आहे. त्यामुळे त्या जागेवर उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत पवारसाहेब आपली भूमिका मांडतील. पण अजितदादांना संधी मिळाली नाही, ती धनुभाऊंना संधी मिळाली आहे. बहीण लाडकी असण्यापेक्षा ती सुरक्षित असणे गरजेचे आहे', असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com