Mumbai News : असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाची नेहमीच चर्चा असते. यंदा विधानसभा निवडणुकीत देखील चर्चा होती. महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असलेला AIMIM पक्ष राज्यात फक्त 14 जागांवर लढत आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत AIMIM पक्षाने 44 जागा लढल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत 288 पैकी फक्त 14 जागांवर AIMIM निवडणूक लढवत असल्याने या पक्षाच्या 'पॉलिटिक्स'ची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Election) चित्र उद्या चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवाशी स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत तिसरी आघाडी आणि राज्यभरातील काही छोटे पक्ष आपपाल्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. यात गेल्या दोन निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाची देखील चर्चा होती. AIMIM पक्ष यंदाच्या निवडणुकीत 14 जागा लढवत आहेत.
मुस्लिम मते मिळावीत आणि अधिकाधिक राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार व्हावा, या उद्देशाने असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी AIMIM पक्ष हैदराबादमधून बाहेर काढला. महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा आपले उमेदवार उतरवले. या पहिल्याच प्रयत्नात असदुद्दीन ओवैसी यांना महाराष्ट्रात यश आले आणि त्यांनी दोन जागा जिंकल्या. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील एक जागा जिंकली.
यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वाधिक 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. त्यामुळे यंदाच्या 2024च्या निवडणुकीत AIMIM सर्वाधिक उमेदवार देईल, अशी चर्चा होती. मात्र पक्षाकडून महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रस्ताव समोर केला. यावर बराच खल झाला. परंतु चर्चा पुढं गेली नाही. विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांनी 288 पैकी 14 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत AIMIM पक्षाने 24 जागांवर निवडणूक लढली होती.
छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यमधून नासीर सिद्दिकी, धुळे शहरातून फारुख अन्वर, मालेगाव मध्यमधून मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पश्चिममधून वारीस पठाण, भायखळामधून फैयाज अहमद खान, मुंब्रा कळव्यातून सैफ पठाण, वर्सोवा येथून रईस लष्करीया, सोलापूरमधून फारुख शाब्दी, मिरजमधून महेश कांबळे, मूर्जिजापुरमधून सम्राट सुरवाडे, कारंजा मानोरामधून मोहम्मद युसूफ, नांदेड दक्षिणमधून सय्यद मोईन आणि कुर्लामधून बबिता कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी दलित आणि मुस्लिम व्होट बँकवर लक्ष असल्याचे दिसते. राज्यात ही महत्त्वाची व्होट बँक आहे. महाराष्ट्रात 13 टक्के दलित, तर 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या 14 उमेदवारांपैकी 11 मुस्लिम आणि तीन दलित उमेदवार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.