Sharad Pawar : "हे घडलं नसतं तर..."; आर. आर. पाटलांवर अजितदादांनी केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Ajit Pawar : सिंचन घोटाळा प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर आरोप केले होते. अजित पवारांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar, R.R Patil, Sharad Pawar
Ajit Pawar, R.R Patil, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळा प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R.R Patil) यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर आरोप केले होते.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जी व्यक्ती जाऊन 9 वर्षं झाली आणि ज्यांचा लौकिक सबंध देशात अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक नेता असा आहे.

त्यांच्या संदर्भातील चर्चा आज करणं योग्य नव्हतं, अशा शब्दात त्यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवाय सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आम्ही नव्हे तर त्यांनीच उपस्थित केला असल्याचंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Ajit Pawar, R.R Patil, Sharad Pawar
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : आप्पासाहेब जगदाळे शरद पवारांची साथ सोडणार

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) आर.आर पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्या संदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, "सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही केला नव्हता, हा मुद्दा कुणी काढला हे सांगायची गरज नाही. मात्र, आम्ही एकाच गोष्टीसाठी अस्वस्थ आहोत की, महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा लौकिक होता.

Ajit Pawar, R.R Patil, Sharad Pawar
Jayashri Jadhav : सतेज पाटलांनंतर ठाकरेंचा नेताही जयश्री जाधवांवर भडकला; म्हणाला, ...तर तुम्ही अपक्ष का लढला नाहीत?

अशा स्वच्छ नेत्याच्या बाबतीत आज पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हे घडलं नसतं तर आनंद झाला असतं. आर.आर. पाटील यांना जाऊन 9 वर्षं झाली. सबंध देशात अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याबाबत अशी चर्चा आज करणं योग्य नव्हतं.." अशा शब्दात पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

नेमकं प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगली (Sangli) येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. शिवाय यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री आर.आर आबा यांनी आपला केसाने गळा कापल्याचा आरोप केला होता. अजितदादांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकारण चांगलं तापलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com