Maharashtra Election Video : निकालानंतर 'ऑपरेशन कमळ'ची काँग्रेसला भीती? कर्नाटकातील बडा नेता मुंबईत ठाण मांडणार

Karnataka leader to monitor post-poll scenario from Mumbai: भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीला बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच महायुतील 160 जागा मिळवेल असा दावा देखील अमित शाह यांच्याकडून करण्यात येतो आहे.
BJP VS Congress
BJP VS CongressSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस शिल्लक आहेत. तर, निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, निकालाच्या आधीच काँग्रेसला 'ऑपरेशन कमळ'ची भीती सतावत असल्याचाही चर्चा आहे. बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाले नाही तर भाजपकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे.

निकालाच्या दिवशी काँग्रेसचे नेते, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार हे मुंबईत येणार आहेत. या विषयी वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. काँग्रेसच्या आमदारांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी डी के शिवकुमार यांच्यावर असणार आहे.

BJP VS Congress
Vinod Tawde : मोदी-अदानी संबंधांचा राहुल गांधींनी 'सेफ' उघडला; भाजपच्या तावडेंचा आमच्याकडे 'कपाट'भर असल्याचा इशारा ...पाहा VIDEO

निकालानंतरची रणनीती काँग्रेसकडून (congress) निश्चित करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महायुती की महाविकास आघाडीला फटका बसणार, हे निकालाच्या दिवशी समजणार आहे.

जर कोणत्याच आघाडीला बहुमत मिळाले नाही तर इतर राज्यातील अनुभव लक्षात घेता भाजपकडून (BJP)आमदार फोडून 'ऑपरेशन कमळ' राबवून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच काँग्रेस सावध झाली असून आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखत आहे.

महायुतीला बहुमत मिळेल

भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीला बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच महायुतील 160 जागा मिळवेल असा दावा देखील अमित शाह यांच्याकडून करण्यात येतो आहे. अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

BJP VS Congress
Supriya Sule : सोलापुरातील पैसे वाटपप्रकरणी राष्ट्रवादी मोठे पाऊल उचलणार; सुप्रिया सुळेंनी केले सूतोवाच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com