
Solapur, 18 November : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पैसे वाटपाच्या व्हिडिओ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. सोलापुरातील पैसा वाटपाचा व्हिडिओ मी पाहिला असून या प्रकरणी मी केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Solapur City North Assembly Constituency) जुने विडी घरकुल परिसरातील राज मेमोरियल शाळेसमोरील गोकुळ नगर भागात पैसे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री एका वकिलाला पकडले होते. तो वकिल सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज महेश कोठे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आल्या होत्या. प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पैसे वाटपाच्या व्हिडिओवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, पैसे वाटपाचा व्हिडिओ मी पहिला आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. तो व्हिडिओ ट्विट करून मी निवडणूक आयोगाकडे न्याय मागणार आहे.
कोणीही अशा पद्धतीने पैसे वाटू नये, या मताची मी आहे. ही सशक्त लोकशाही आहे. भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या संविधानाने देश चालला पाहिजे, कोणाच्या खोक्याने नाही, त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे या पैसे वाटप प्रकरणी दाद मागणार आहोत, असेही सुळे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवट लावली, असे विधान केले होते. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे. आमच्यावर आरोप करण्यासाठी त्यांचेकडे काही राहिलेलं नाही. भ्रष्टाचार, महागाई प्रचंड वाढलेले आहे. हे सगळेच विषय भाजपचे आहेत, त्यांच्याकडे विषय नाहीत; म्हणून ते असले आरोप करत आहेत. कोणतीही सत्ता नसतान शरद पवार हे सगळं करू शकत असतील तर भाजपने तेवढं तरी मान्य करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
देवाभाऊकडे (देवेंद्र फडणवीस) विकासाचे काही मुद्देच राहिले नाहीत. भ्रष्टाचार देवाभाऊच्या गळ्यामधलं लॉकेट झालं आहे. त्यांच्या सगळा वेळ घरं आणि पक्ष फोडण्यात जातोय, त्यामुळे ते विधानसभा निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध आहे, असे सांगत आहेत, असा आरोपही सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.