अमेरिकेमध्ये गौतम अदानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. अदानींच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. "गौतम अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत,' असा आरोप काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अदानींना जेव्हा अटक होईल, तेव्हा मोदी जातील. अदानींनी भारताला हायजॅक केले आहे, भष्ट्राचारी अदानींना मोदींनी अद्यापही अटक केलेली नाही. अदानी यांना मोदी अटक करणार नाही, कारण त्यांना अटक केली तर मोदी सत्तेत राहणार नाहीत, त्यामुळे अदानींना मोदी संरक्षण देत आहेत, असे गांधी म्हणाले.
राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तर ही वाढलेली टक्कीवारी भाजपच्या फायद्याची असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. लाडकी बहीणींनी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. यंदा मतांचा टक्का वाढला आहे त्याचा फायदा आम्हाला होईल, असा दावा त्यांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदानाची टक्केवारी वाढली की त्याचा फायदा भाजपला होतो असं म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
सिल्लोड विधानसभेसाठी यंदा 80.08 टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे.
सिल्लोड विधानसभेसाठी पुरुष मतदारांनी केलेलं मतदान - 150585
तर स्त्री मतदारांनी केलेलं मतदान - 136095
इतर - 02
तर या विधानसभेसाठी झालेलं एकूण मतदान - 286682
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विक्रमी मतदान झालं आहे. तर 1990 नंतर पहिल्यांदाच 65 % टक्क्यांच्या पुढे मतदानाचा आकडा गेला आहे. राज्यात यंदा 65.11% मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत मतदानात 3.67% टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मतदानात झालेली वाढ कोणाच्या पथ्यावर पडणार हे 23 नोव्हेंबरलाच कळणार आहे.
2019 मध्ये 61.44% मतदान
2014 मध्ये 63.38% मतदान
2009 मध्ये 59.68% मतदान
1999 मध्ये 63.44% मतदान
1995 मध्ये 60.95% मतदान
1990 मध्ये झालं होत 71.69% मतदान
भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतली एका कंपनीने गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अदानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे. प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच संतापला असून स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंना इशारा दिला आहे. तर संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळल्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यात 288 विधानसभेच्या जागासाठी बुधवारी मतदान पार पडलं. तर अनेक एक्झिट पोलनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मतदानाची टक्के वारी वाढल्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि महायुतीला फायदा होतो, असं म्हटलं आहे.
राज्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महायुतीचं बहुमताचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षांचा कार्यकाळ लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलेले असून राज्यात येणार सरकार महायुतीचं आणि बहुमताचेच असेल असा विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.