Jyoti Mete : मोठी बातमी! ज्योती मेटेंनी हाती घेतली 'तुतारी', शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Shiv Sangram Party Leader Jyoti Mete Joined NCP Sharad Pawar Party : बीड विधानसभा मतदारसंघातून ज्योती मेटे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तुतारी चिन्हावर त्या बीड विधानसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jyoti Mete Join NCP SP
Jyoti Mete Join NCP SPSarkarnama
Published on
Updated on

Jyoti Mete News: दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी, 'शिवसंग्राम'च्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, बीडमधून बजरंग सोनवणे यांना तिकीट मिळाले.

ज्योती मेटे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्या आपली संघटना शिवसंग्राममधून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मेटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली होती. मात्र, आज (रविवारी) शरद पवार जयंत पाटील, विजयसिंह मोहिते- पाटील, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

बीड विधानसभा मतदारसंघातून ज्योती मेटे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तुतारी चिन्हावर त्या बीड विधानसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्योती मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

Jyoti Mete Join NCP SP
BJP Candidate List : विद्यमान आमदार, महिला उमेदवार, नातेवाईकांना तिकीटं… ही आहेत भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये

बीडमध्ये उमेदवारीसाठी चुरस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवारांना साथ दिली. त्यामुळे त्यांना बीडमधून उमेदवारीसाठी त्यांच्यात आणि ज्योती मेटेंमध्ये चुरस असणार आहे.

भाजपकडून मुंदडा

भाजपने आपली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला नाही. नमिता मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून संदीप क्षीरसागर लढणार की ज्योती मेटे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Jyoti Mete Join NCP SP
Mahavikas Aghadi : पवारांच्या राष्ट्रवादीची मध्यस्थी निष्फळ; ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये 12 जागांवरून तिढा कायम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com