महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी १५ जणांची पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली आहे.
आज (शनिवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सामना वर्तमानपत्रातून 15 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आजच सायंकाळी ट्विटकरत तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीमध्ये भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विलेपार्लेमधू संदीप नाईक आणि वर्सोवा मतदारसंघातून मुस्लिम चेहरा देत हरुन खान यांना उमेदवारी दिली आहे.
लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणारे रासपचे नेते महादेव जानकार यांनी विधानसभेला 'एकला चलो'चा नारा दिला आहे. राज्यातील सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. अशातच आज त्यांच्या पक्षाच्या 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. आमचे जागावाटप पूर्ण झाले आहे. फक्त सात जागांवर तिढा आहे. महाविकास आघाडीसारखे 90-90-90 आमच्यामध्ये नाही. मला तर हसू येत आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. अनिल देशमुख यांच्या पुस्तकावर देखील बावनकुळे यांनी टोला लगावत आम्ही त्या पुस्तकाची चर्चा करत नाही, असे म्हटले. त्यांच्याकडे तुरुंगात मोकळा वेळ होता म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले, अशी खिल्ली देखील बावनकुळेंनी उडवली.
भाजप आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. प्रशांत परिचारक काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लातूर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर इच्छूक आहेत. मात्र, भाजपमधून त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे लातूर मतदारसंघातून अजून उमेदवारी जाहीर केली नाही. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा आहेत. अर्चना पाटील चाकूरकर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने लातूर मतदारसंघाचा पेच सुटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सुनिल टिंगरेंना वडगाव शेरी विधानसभेची जागा सुटल्याने जगदीश मुळीक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता मुळीक देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे फडणवीस त्यांची ही नाराजी दूर करणार का? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. याआधी दोन ते तीन वेळा मुळीक यांनी फडणवीसींची भेट घेतली होती. मात्र, तरीही ती जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे देशमुख म्हणाले आहेत. पुस्तक लिहण्याची घोषणा दोन महिन्यापूर्वी देशमुख यांनी केली होती. मात्र, हे पुस्तक लिहण्यास वेळ का लागला, याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. देशमुख म्हणाले, मी दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की मी पुस्तक लिहित होतो. लिहायला वेळ लागतो. या पुस्तकामध्ये जे आरोप केले त्यात प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स आणि पुरावा आहे.हे रेफरन्स जमा करून पुरावे गोळा करून पुस्तक लिहायला विलंब झाला.
काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये, भुसावळ, जळगाव, अकोट, वर्धा, सावनेर, नागपूर दक्षिण, कामठी, भंडारा, आमगाव, राळेगाव, यवतमाळ, आर्णी, उमरखेड, जालना, वसई, कांदिवली पूर्व, निलंगा, शिरोळ, सायन कोळीवाडा, चारकोप, श्रीरामपूर, औरंगाबाद पूर्व, अर्जून मोरगाव या मतदारसंघाचा समावेश आहे.
उमेदवारांची नावे -
भुसावळ - राजेश मानवटकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखर शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरीश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
छत्रपती संभाजीनगर पूर्व : मधुकर देशमुख
वसई - विजय पाटील
कांदिवली पूर्व - काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळीवाडा - गणेश यादव
श्रीरामपूर - हेमंत ओगले
निलंगा - अभय कुमार साळुंखे
शिरोळ - गणपतराव पाटील
महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. त्यामुळेच आमचा 90-90-90 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच एका जागेची अदलाबदल केली आहे. नांदेड उत्तर आणि हिंगोलीच्या जागेबाबत नाना पटोलेंशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज पहाटे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली आहे. यापूर्वीही सामंत यांनी जरांगेंची भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपने सर्वात आधी उमेदवार यादी जाहीर करत आघाडी घेतली होती. त्यानंतर आता भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. य यादीत मुंबईतील वादग्रस्त जागांबाबता समावेश असण्याची शक्यता आहे. या संदर्भात काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानुसार काही जागा शिवसेनेला देण्याची चर्चा तर काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीचीही शक्यता वर्तवली जात आहे.
विलेपार्ले मतदारसंघाबाबत आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष निर्णय घेणार. विलेपार्ले आणि वर्सोवाबाबत आज शिवसेना अधिकृत निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यातील वाद पेटला आहे. धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य विधान केल्याने संगमनेर तालुक्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून संतप्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गाड्यांना आग लावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.