Rahul Gandhi : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ घोषणेला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले... आम्ही सोबत आहोत!

Congress Rahul Gandhi supports Uddhav Thackeray's stand: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असून राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला.
Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या याबाबतच्या एका घोषणेचेही समर्थन केले.

महाविकास आघाडीच्या रविवारी झालेल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंनी उद्योगपती गौतम अदानींबाबत मोठे विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, आमची सत्ता आली तर मी मुख्यमंत्री होईल ना होईल पण मंत्रिमंडाळाच्या पहिल्याच बैठकीत अदानींना दिलेले सर्व प्रकल्प मी काढून घेईल.

Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : सत्ता आल्यानंतर कॅबिनेटमध्ये 'हा' निर्णय पहिला घेणार, उद्धव ठाकरेंनी केले जाहीर

याबाबत राहुल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंच्या घोषणेला पाठिंबा दिला. ते म्हणाले, आमचे येणारे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कांचे संरक्षण करेल. धारावीत जे होत आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या, धारावीतील रहिवाशांच्या, मुंबईकरांच्या हक्कांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही सोबत आहोत. उद्धव ठाकरेंनी जे म्हटले आहे, ते योग्य आहे. माझा त्याला पाठिंबा आहे.

‘एक है तो सेफ है’ची खिल्ली

राहुल गांधींनी यावेळी मोदींच्या एक है तो सेफ है या नाऱ्याची खिल्ली उडवली. पत्रकार परिषदेत आणण्यात आलेल्या तिजोरीवर ‘एक है तो सेफ है’ हा नारा लिहिण्यात आला होता. त्यातून दोन फोटो बाहेर काढले. त्यातील एका फोटोवर मोदी आणि अदानींचा एकत्रित फोटो होता. त्यावरही हाच नारा लिहिण्यात आला होता. दुसऱ्या फोटोमध्ये धारावीचा निकाशा होता.

Rahul Gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Rahul Gandhi : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत फोडला तिजोरी बॉम्ब; दोन फोटो दाखवत मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधींनी हे फोटो दाखवत मोदींच्या मदतीशिवाय अदानींना हे काम मिळूच शकत नाही, असा दावा केला. धारावीमध्ये एक लाख कोटी रुपयांचा धंदा सुरू आहे. एक नरेंद्र मोदीजी, अदानीजी सेफ आहेत. यात धारावीतील जनेतेचे नुकसान होणार आहे. एका व्यक्तीसाठी येथील उद्योग संपवले जाणार आहेत. मोदींनी योग्य नारा दिला आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com