Devendra Fadnavis News: विधासभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आज (बुधवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदे घेत महायुतीच्या कामाचे रिपोट कार्ड ठेवले. या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी शरद पवारांना चॅलेंज दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सत्तापक्षाला चिंता नाही. मुख्यमंत्री स्वतःच बसले आहेत. मी पवारसाहेबांना आव्हान करतो पवारसाहेब तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण तेवढं सांगा.'
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक कन्फूज करत आहेत. ते टीका करतात की सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहिणीवर टीका करत आहेत. मात्र, तेच विरोधक आमचं सरकार आलं की दोन हजार देऊ असं सांगत आहेत. त्यामुळे विरोधकांनी ठरवलं पाहिजे की सरकारकडे पैसै आहेत की नाही. सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक सुरू करत आहेत, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.
मुख्यमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा नाव न घेता टोला लगावला. शिंदे म्हणाले, आमच्याकडे कोणाला मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले नाहीत. आमचं सव्वादोन वर्षांचं काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा.
टोलमाफी, महिला, युवक, कामगार यांच्यासाठी आणलेल्या कल्याणकारी योजना राबवून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी काय केले, याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मराठ्याना आरक्षणाचा दिलेला शब्द देखील आम्ही पाळला. मात्र, आम्ही दिलेल्या आरक्षणाविरोधात न्यायालयात कोणं गेलं हे देखील पाहा, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.