Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील सत्तरीपार मतदारांची आकडेवारी पाहून व्हाल अचंबित; कुणासाठी ठरणार निर्णायक?

Maharashtra Voters List Election Commission : महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 70 लाखांहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांचे मतदान निर्णायक ठरू शकते. लाडकी बहीण योजनेमुळे महिला कुणाला मतदान करणार, याबाबत उत्सुकता आहे. पण सत्तरी पार केलेल्या आणि या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या महिलांचे मतदानही निर्णायक ठरणार आहे.

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक आयोगाकडून नुकतीच ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election
Shaina NC VIDEO: मला 'माल' बोलता..."तुम्ही बेहाल होणार .." शायना एनसी यांचा अरविंद सावंतांवर हल्लाबोल

आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 38 मतदारसंघांमध्ये महिलाराज आहे. म्हणजेच पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. एवढेच नाही तर सत्तरी ओलांडलेल्या मतदारांमध्येही महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. 18 ते 69 या वयोगटातील प्रत्येकी दहा वर्षांच्या वयोगटात पुरुष मतदार अधिक आहेत. मात्र, 70 वर्षाहून अधिक वय असलेल्या मतदारांचा आकडा पाहिला तर महिलांचा टक्काच अधिक आहे.

वर्ष 70 ते 79 या वयोगटातील एकूण मतदारांमध्ये पुरुष मतदार 26 लाख 36 हजार 345 तर महिला मतदार 27 लाख 16 हजार 424 एवढे आहेत. 80 ते 89 या वयोगटातील एकूण 20 लाख 33 हजार 958 मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा दोन लाखांहून अधिक आहे. हीच स्थिती 90 ते 99 या वयोगटातील मतदारांची आहे. या वयोगटात पुरुष मतदार 1 लाख 97 हजार 323 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 50 हजार 715 इतकी आहे.

Maharashtra Assembly Election
Solapur Election: मोदी, शहा, पवार, गांधींसह तेलुगू अभिनेतेही गाजवणार सोलापुरात विधानसभेचा आखाडा

दरम्यान, राज्यात मतदानासाठी एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र असतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

वयोगटानुसार मतदारसंख्या -

-    18 ते 19 - 22 लाख 22 हजार 704

-    20 ते 29 - 1 कोटी 88 लाख 45 हजार 5

-    30 ते 39 - 2 कोटी 18 लाख 15 हजार 278

-    40 ते 49 - 2 कोटी 7 लाख 30 हजार 598

-    50 ते 59 - 1 कोटी 56 लाख 10 हजार 794

-    60 ते 69 - 99 लाख 18 हजार 520

-    70 ते 79 - 53 लाख 52 हजार 832

-    80 ते 89 - 20 लाख 33 हजार 958

-    90 ते 99 - 4 लाख 48 हजार 38

-    100 ते 109 - 47 हजार 169

-    110 ते 119 - 113

-    120 हून अधिक - 110

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com