Mumbai News: विधानसभा प्रचारात काही नेते खालच्या पातळीवर टीका करीत आहे. अशाच प्रकार मुंबादेवी येथे नुकताच घडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे.
प्रचारात बोलताना सावंत यांची जीभ घसरली. सावंत यांच्या या विधानामुळे त्यांचा निषेध करण्यात येत आहे. शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत.
शायना एनसी यांना अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे माल असं म्हटलं आहे. त्यावर शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांचा समाचार घेतला घेत त्यांना सुनावले आहे. एखाद्या स्त्रीला माल शब्द वापरणं म्हणजे तिचा अपमान करणं आहे. जे उद्धव ठाकरे गटाचे नेते करीत आहेत. माल बोलल्याने तुम्हीच आता बेहाल होणार आहात, अशा शब्दात शायना एनसी यांनी सावंतांना खडेबोल सुनावले.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होत्या.
"अरविंद सावंत यांनी माल म्हणून उल्लेख केला.यातून त्यांच्या पक्षाची मनस्थिती दिसते. त्यांची विचारधारा काय आहे हे समजते. एका महिलेला माल म्हणून संबोधतात..." असे त्या म्हणाल्या.
मला त्यांना विचारायचे आहे की, मुंबादेवीची प्रत्येक महिला माल आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमीन पटेल यांच्या प्रचारसभेत अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. "आम्हाला इम्पोर्टेड माल नको... आमचा ओरिजनल माल आहे.." असे अरविंद सावंत म्हणाले.
आम्ही ज्यांच्यासाठी 2014, 2019 आणि 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला होता. जे मोदींच्या नावाचा वापर करून जिंकून आले आहेत. आज विधानसभा निवडणुकीत मला माल बोलत आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाला विचारू इच्छिते की, तुम्ही गप्प का आहात? जो व्यक्ती एका महिलेचा सन्मान करू शकत नाही आणि माल या शब्दाचा वापर करतो, त्याच्याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि नाना पटोले यांनी बोलणं गरजेचं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.