Pune News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना गेमचेंजर ठरेल, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीकडूनही आता योजनेची रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले जात आहे.
प्रत्यक्ष या योजनेचा मतदानावर किती परिणाम होईल, हे निकालातून दिसेलच. पण राज्यातील 38 मतदारसंघातील आमदार निवडीत या लाडकी बहिणींचाच वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाकडून राज्यातील मतदारांची 30 ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष आणि 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 6 हजार 101 एवढी आहे. एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
राज्यात विधानसभेचे 288 मतदारसंघ असून त्यापैकी 38 मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. तर अनेक असे मतदारसंघ आहेत जिथे महिला व पुरुष मतदारांच्या संख्येत फारसे अंतर नाही. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत महिलांचा कल महत्वाचा मानला जात आहे.
जिल्ह्यांचा विचार केला तर नंदूरबार, भंडारा, गोंदिया आणि रत्नागिरी या चा जिल्ह्यांत महिला मतदार अधिक आहेत. मात्र, मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिल्यास कोकणापासून विदर्भापर्यंत महिलांची संख्या अधिक असलेले मतदारसंघ आहेत.
शहादा, नंदूरबार, अकोला पश्चिम, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, तिरोडा, भंडारा, गोंदिया, साकोली, आमगाव, अर्जूनी मोरगाव, अरमोडी, डहाणू, ब्रम्हपूरी, पालघर, माहिम, कर्जत, अलीबाग, श्रीवर्धन, महाड, कसबा पेठ, शिरोळ, कोल्हापूर उत्तर, कागल, चंदगड, सोलापूर शहर उत्तर, दापोली, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, कुडाळ, मिरज आणि पलूस कडेगांव.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.