Congress Politics : मोठी बातमी! राहुल गांधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराज, जागावाटपाचा...

Congress Politics Assembly Election Rahul Gandhi Nana Patole : बाहेरुन काँग्रेस टार्गेट केला जातोय. विदर्भात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मुंबईत यामध्ये मेरीटवर जास्त जागा मिळायला हव्या होत्या, असे नाना पटोले म्हणाले.
Nana Patole & Rahul Gandhi
Nana Patole & Rahul GandhiNana Patole & Rahul Gandhi
Published on
Updated on

Congress Politics : काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक दिल्लीत राहुल गांधी, काँग्रस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीत महाराष्ट्रात वाटाघाटी करताना काँग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका पार पाडली नसल्याचे मत राहुल गांधी यांचे आहे. त्यांनी याबाबत बैठकीत नाराजी देखील व्यक्त केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत वाटाघाटीत काँग्रेस कमी पडली तसेच मुंबई आणि विदर्भातील काही जागा मित्रपक्षांना सोडल्याने देखील राहुल गांधी यांनी नाराजी बोलून दाखवली.

नाना पटोले म्हणाले, "बाहेरुन काँग्रेसला टार्गेट केले जात आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात, मुंबईत मेरीटवर काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, मित्रपक्षांशी वाटाघाटी करताना घोळ झाला. त्याबाबत राहुल गांधींना सांगितले त्यावर त्यांचे समाधान झाले'

Nana Patole & Rahul Gandhi
BJP Politics : काल भाजपचा राजीनामा, आज पुन्हा प्रवेश; उमेदवारी मिळणार?

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी आजच जाहीर करणार आहेत तर शेवटची तिसरी उमेदवार यादी उद्या जाहीर करणार आहोत. जागावाटप हा सगळ्यांसाठी पेच असणारा विषय असतो. कार्यकर्त्यांचा दबाव असतो. सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही जात आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

विश्वगुरुंच्या पक्षात देखील जागावाटपात अलबेल नाही मात्र त्याविषयी कोणी बोलत नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

ओबीसींना जागा देण्याचा आग्रह

ओबीसीतील दुर्लक्षित जातींना उमेदवारांच्या यादीत स्थान द्या, ओबीसींच्या जागांवर विशेष लक्ष द्या. आपण जातीय जनगणना आणि ओबीसी मुद्यावर आक्रमक आहोत त्यामुळ त्यांना प्रतिनिधित्व मिळाल पाहिजे,असा सूचना राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.

बाळासाहेब थोरात उद्या (शनिवारी) शरद पवार यांना भेटणार आहेत. उद्या पुन्हा राहिलेल्या जागांवर चर्चा होईल.तसेच सीईसीची बैठक आता दिल्लीला होणार नाही. उद्या बैठक ऑनलाईन बैठक होईल असे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole & Rahul Gandhi
Mahavikas Aaghadi : शरद पवारांच्या भेटीनंतर अबू आझमींचा आघाडीला अल्टिमेटम; उरले काही तास...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com