BJP Politics : काल भाजपचा राजीनामा, आज पुन्हा प्रवेश; उमेदवारी मिळणार?

BJP Politics Assembly Election Morshi constituency : चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आमचे पार्लेमेंट्री बोर्ड घेते. आज आणि उद्या भाजपची तिसरी यादी जाहीर होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
Bjp Flags
BJP FlagsSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. अजितदादा यांच्या जवळचे मानले जात असलेले येथील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप केलेली नाही.

दुसरीकडे काल (गुरुवारी) भाजप सोडून गेलेल्या इच्छुक पदाधिकारी उमेश यावलकर आज (शुक्रवारी) पुन्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. हे बघता उमेश यावलकर यांचे नाव मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी निश्चित केले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे मतदार दरवेळी नवा आमदार निवडून देतात. विद्यमान आमदार भुयार यांनी भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी मंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे बोंडे हेसुद्धा अपक्ष निवडून आले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पराभूत झाले. त्यांना आता राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे.

Bjp Flags
Mahavikas Aaghadi : शरद पवारांच्या भेटीनंतर अबू आझमींचा आघाडीला अल्टिमेटम; उरले काही तास...

आमदार भुयार अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतरही ते त्यांच्यासोबत आहेत. शिंदेसेनेची त्यांना ऑफर होती. गोहाटीमध्ये त्यांना बोलावले होते. मात्र त्यांनी यास ठाम नकार देऊन अजित पवार यांच्यासोबत राहण्याचे ठरवले होते. मात्र महायुतीमुळे आता त्यांची अडचण झाली आहे.

भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपने अजित पवार यांच्यासाठी सोडला आहे. आमदार सुलभा खोडके यांची उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. मात्र भुयार यांना होल्डवर ठेवण्यात आले आहे. या घडामोडी बघता मोर्शी विधानसभा भाजपच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. याच कारणामुळे यावलकर यांना परत प्रवेश देण्यात आला असा कयास वर्तविला जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आमचे पार्लेमेंट्री बोर्ड घेतात असे सांगून त्यांनी याविषयावर अधिक भाष्य करणे टाळले. आज आणि उद्या भाजपची दुसरी व तिसरी यादी जाहीर होईल असेही त्यांनी सांगितले.

Bjp Flags
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : ओबीसी उमेदवारांसाठी राहुल गांधी आग्रही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com