Assembly Election : EVM मशीन बनवणारी कंपनी ते हॅक करू शकते? कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने केला जातोय दावा

Maharashtra Assembly Election Result Jitendra Awahad ECIL EVM VVPAT : जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटचा हवाला देत पुन्हा ईव्हीएम हॅक होऊ शकते असा दावा केला आहे.
ECIL EVM Machine
ECIL EVM MachineSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर देशभरात EVM ला विरोधकांकडून कडाडून विरोध सुरू झाला आहे. ईव्हीएमविरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केल्याचीही चर्चा आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडिओचा हवाला देत त्यात भर टाकली आहे.

आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ईव्हीएम हॅकिंगबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी एक्सवरील दीप अग्रवाल नावाच्या व्यक्तीची एक पोस्ट शेअर केली आहे. आव्हाडांनी म्हटले आहे की, ECIL (Electronic corporation of india ltd.) ही भारत सरकारची कंपनी आहे. ही कंपनी भारतीय निवडणूक आयोगासाठी EVM बनवण्याच काम करते.

कंपनीच्या बाबत TheQuint ने केलेला दावा अत्यंत गंभीर आहे. यानुसार, ECIL मध्ये काम करणाऱ्या काही लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्या कर्मचाऱ्यांनी हा दावा केला आहे की, EVM मशीन बनवणारी कंपनी ECIL ही VVPAT मध्ये लागणाऱ्या Symbol loading Unit (SLU) द्वारे EVM मशीन हॅक करू शकते, असे आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत हेच "सिम्बॉल लोडींग युनिट" काही वेळासाठी इंटरनेट च्या संपर्कात येते. ही बाब खरी असेल तर अत्यंत गंभीर आहे. यापुढे देशात निवडणुका घेण्यात काहीच हशील होणार नाही. अशाने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा बटिक बनला आहे. ही बाब आता जनतेच्या समोर अधिकच ठळक आणि स्पष्ट बनत चालली असल्याचेही आव्हाडांनी लिहिले आहे.

दरम्यान, विरोधकांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतले जात असल्याने महाराष्ट्रातील निवडणूक कार्यालयाने व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांच्या पडताळणीबाबत मंगळवारी महत्वाची माहिती देण्यात आली. विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1440 व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची मोजणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. यामध्ये ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत नसल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com