Congress Politics : हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला. मात्र, जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स सोबत निवडणूक लढल्याचा फायदा काँग्रेसला झाला. तेथे नॅशनल काॅन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले. आज (बुधवारी) ओमर अब्दुला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे आघाडीत निवडणूक लढूनही काँग्रेस ओमर अब्दुलांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाली नाही. सत्तेत वाटा घेतला नाही. काँग्रेसने नॅशनल काॅन्फरन्सला बाहेरुन पाठींबा दिला आहे.
काँग्रेस सत्तेत सहभागी न होण्याचे कारण महाराष्ट्रातील निवडणुका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसने सावध पाऊल टाकल्याचीही चर्चा आहे.
नॅशनल काॅन्फरन्स-काँग्रेस आघाडीला 48 जागा मिळाल्या. काँग्रेसने सहा जागांवर तर नॅशनल काॅन्फरन्स 42 जागांवर विजय मिळवला. मात्र, जम्मू-काश्मीरला जोपर्यंत संपूर्ण राज्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत सत्तेत सहभागी होणार नसल्याचे सांगत काँग्रेस मंत्रिमंडळात सहभागी झाली नाही.
नॅशनल काॅन्फरन्सची भूमिका ही काँग्रेसला महाराष्ट्रातील प्रचारात त्रासदायक ठरू शकते. नॅशनल काॅन्फरन्सच्या जाहीरनाम्यावरून भाजप काँग्रेसला प्रचारात टार्गेट करेल. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीचा विचार करून काँग्रेस जम्मू काश्मिरमध्ये सत्तेत सहभागी झाली नसल्याची चर्चा आहे.
नॅशनल काॅन्फरन्सने आपल्या जाहिरनाम्यात जम्मू काश्मीरला वेगळं संविधान आणि ध्वज देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सार्वजनिक सुरक्षा कायदा रद्द करण्याचे भारत-पाकिस्तान यांच्यातील संवाद वाढवण्याचा शब्द नॅशल काॅन्फरन्स दिला आहे. कलम 370 आणि 35 ए पुन्हा लागू करण्याच्या उल्लेख नॅशल काॅन्फरन्सच्या जाहिरनाम्यात आहे. नॅशनल काॅन्फरन्सच्या या भूमिका महाराष्ट्रात काँग्रेसच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. यावरून भाजपने प्रचारात रान पेटवले असते तो ओळखून काँग्रेसने जम्मू कश्मिर सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.