विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीन निवडणूक आयोग जोमाने कामाला लागले आहे. भरारी पथके, स्थिर पथके, पोलिस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जात आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता.20) सार्वजनिक सुट्टी असेल असेल तसे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.
पैशाची वाहतूक करणारे दोन वाहने अमरावती पोलिसांनी जप्त केले.तसेच या वाहनांमधील तब्बल अडीच कोटींची रक्कम देखील जप्त केली. खासगी कंपनीची कॅश वाहतूक करणारी ही वाहने असल्याचे समोर आले आहे.
पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, पक्ष उभारायला अक्कल लागते. एखाद्याला उद्धवस्त करायला अक्कल लागत नाही. उभं करायला अक्कल लागते, असा टोला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.
सुप्रीम कोर्टात आज आमदार अमोल मिटकरी यांनी व्हिडिओच्या उल्लेखानंतर मिटकरी यांच्याकडून शरद पवार यांचा व्हिडिओ डिलिट केला. अनवधानाने व्हिडिओ पोस्ट झाल्याचा मिटकरी यांचा दावा केला. घडलेल्या घटनेबद्दल सुप्रीम कोर्टाची व्यक्त केली दिलगिरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्ष माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे यांना चॅलेंज केले आहे. नाव न घेता हे किडे माझे काय करणार असा उल्लेख सत्तार यांनी केला तसेच मुख्यमंत्री बदलण्याची ताकद मी ठेवतो, असे सत्तार म्हणाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी भरारी पथकाकडून करण्यात आली. मात्र नाना पटोले यांनी बॅग न आणल्याने पथकाला तपासणीच करता आली नाही. आर्णी विधानसभा मतदारसंघाचे जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ घाटंजी येथे नाना पटोले यांची जाहीर सभा होती. यावेळी भरारी पथकाने नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.
पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांचा तपासणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे, यासाठी ते पालघर येथे आले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा दोनदा तपासण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आज त्यांचा ताफा अडवण्यात आला आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग येथे येत असताना इन्शुली चेक नाक्यावर ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे चांगलेच संतापले. शिवाय गाडीत उद्धव ठाकरे आहे हे समजताच ताफा लगेच सोडून देण्यात आला.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सावंतवाडीतील राजन तेलींच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेतून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "मविआचं सरकार सत्तेत येणारच आहे. कोकणाचं अदानीकरण होऊ देणार नाही. महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग अजून तसाच उभा आहे. पण दरोडेखोरांनी उभारलेला पुतळा काही महिन्यांत पडला. केसरकर पडल्यावर सिंधुदुर्गात सगळ चांगलं होईल."
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टासमोर सुरु आहे. शरद पवार यांचे नाव, फोटो वापरु नका, असा आदेश कोर्टाने अजित पवार गटाला दिला आहे. 'कोर्टाने दिलेले आदेश आम्ही पाळले' असे अजित पवार यांच्या वकिलांना कोर्टात सांगितले. अजित पवार यांच्या वकिलांकडून ज्याा मराठी वर्तमान पत्रात जाहिराती दिल्या त्या वर्तमान पात्रांची नाव कोर्टात सांगितली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'उद्योजकांच्या मर्जीने राजकारण होऊ शकत नाही.' असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीच्या आधी शरद पवारांची गौतम अदानी आणि अमित शहांसोबत झालेल्या बैठकीचा दावा खोडून काढला आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "सरकार स्थापन झालं नाही तर चर्चा कशाला करायची. पण ही गोष्ट खरी आहे की, मी अनेक वेळा अजित पवारांना घेऊन अनेकांसोबत बैठक घेतली आहे. देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय तीन ते चार वेळा भेटलो असेल.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यात दोन सभा होणार आहेत. बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ अजित पवार जाहीर सभा घेत आहेत.
तुम्ही केवळ आरोपी आहेत म्हणून कुणाचे घर पाडू शकत नाही. अधिकारी आणि सरकारची मनमानी वृत्ती योग्य नाही, देशात कायद्याचे राज्य हवे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सरकार आणि प्रशासनाला सुनावलं आहे.
महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला असून राज्यात जवळपास 170 जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच खासकरून विदर्भात सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यामागे अदानीचा हात होता आणि सरकार पाडण्यामागे देखील अदानी होता हे अजित पवार कबूल करत आहेत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो? ही मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग अदानीला विकण्याचा डाव नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
बिहार, बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसामसह देशातील 11 राज्यातील 31 विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तर राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी देखील आज मतदान होत आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून प्रियंका गांधी तर भाजपकडून नव्या हरिदास यांची उमेदवारी देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे झाल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंब्रा येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 43 जागांसाठी आज मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात शरद पवारांनी याचिका दाखल केली आहे. मागच्या सुनावणी वेळी कोर्टाने अजित पवारांना राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात 36 तासांच्या आत पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा उल्लेख असलेली जाहिरात देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.