Maharashtra Assembly Session : तालिका अध्यक्षांकडून राजकीय टिपण्णी, विजय वडेट्टीवार आक्रमक

maharashtra assembly monsoon session 2025 vidhansabha adhiveshan mva vs mahayuti : राज्य विधीमंडळाचे अधिवेशनाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Live Update
Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

कोकणातील वीज प्रश्नावर निलेश राणेंनी मांडली लक्षवेधी

पावसामुळे कोकणात पावसात वारंवार वीज जाते. कोकणात डीपीआरचे पैसे अखर्चित आहे. कमी दाबाची वीज मिळते. डीपीआर दुरुस्त होणार कधी? असा प्रश्न निलेश राणे यांनी सभागृहात मांडला.

सरकारने दिंडोरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; खासदार भास्कर भगरे यांची मागणी

दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे यावर्षी शेतीची मशागत नसल्याने, शेतकऱ्यांना पेहरणीसाठी शेतात शेतकऱ्यांना जाता आले नाही. जोरदार पाऊस असल्याने शेतीमध्ये पेरणीसाठी वापसा नसल्याने, त्या ठिकाणी पेरणी न करता आल्यामुळे किंवा पेरलेले पीक पावसाने खराब झाले. दिंडोरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे.

तालिका अध्यक्षांकडून राजकीय टिपण्णी, विजय वडेट्टीवार आक्रमक

सभागृहात तालिका अध्यक्षांकडून टिपण्णी करण्यात आली. त्यासंदर्भात विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. विरोध सदस्यांवर तालिका अध्यक्षांकडून राजकीय टीपण्णी करणे अयोग्य आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोध पक्षाने दिलेला प्रस्ताव हा नाटकी आहे, असे बोलणे योग्य नसल्याचे देखील वड्डेट्टीवार म्हणाले.

पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या केदार सोमण याच्या घरी जाऊन त्याला मारण्याच्या तयारीत मनसेचे पदाधिकारी होते. पोलिस केदार याला घेऊन जात असताना मनसे पदाधिकाऱ्यांना त्याला मारण्याचा प्रयत्न केला. केदार याची चौकशी करून पोलिसांनी त्याला घरी सोडून दिले आहे. मात्र,आज सकाळपासून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. मात्र घटनेवरून ताब्यात घेतले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

सभागृहात मंत्री उपस्थित सदस्य गैरहजर, संजय शिरसाट संतापले

लक्षवेधीच्या वेळी लक्षवेधी उपस्थित करणारे सदस्य सभागृत नसल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला रात्री साडेआकरा वाजता लक्षवेधी मिळाली आम्ही सभागृहात उपस्थित राहिलो. मात्र, सदस्य उपस्थित राहणार नसतील तर हा विषय रेकाॅर्डवर आले पाहिजे. सभागृहाचा, अधिकाऱ्यांचा वेळ वाया जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com