मराठी विजयोत्सवातील उद्दव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच भाषण 'रुदाली'च भाषण होतं अशी टीका केली होती. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपने इतर पक्षातील उरबडवे घेतले. भाजपला या लोकांनी मारुन टाकलंय. त्यामुळे मुळ भाजप पक्ष मेला आहे. यांच्याकडे ऊर बडवायला ओरिजनल माणसं नाहीत. ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावी लागतात. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये 6,336 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवल्याने संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली गेला आहे.
तर पुराचा इंडिकेटर समजला जाणारा दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पुराचे पाणी पोहोचले आहे. अद्यापही नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नाशिकला पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
आशिष शेलारांनी मनसेच्या आंदोलनाची थेट पहलगाम हल्ल्याशी तुलना केली होती. त्यावरुन उद्दव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचेच लोक महाराष्ट्र आणि मराठीचे मारेकरी असल्याचा जोरदार पलटवार उद्धव ठाकरेंनी आशिष शेलार यांच्यावर केला आहे. मराठी भाषेच्या मारेकऱ्यांना ओळखलं पाहीजे. तसंच पहलगाममधील अतिरेकी भाजपात गेले का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा. महाराष्ट्रा बाहेर या पटकून मारु असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं.
यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने हिंदी भाषेचा जीआर परत घेण्यासाठीच आणला होता. तो फक्त डिवचण्यासाठी आणला गेला. हा त्यांचा ट्रॅप होता, त्यांना त्यांना 365 दिवस फक्त राजकारण करायचं असतं. ते म्हणाले हाच निशिकांत दुबे होता ज्याने सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे यादवी पेटवू इच्छितात असं म्हटलं होतं. सर्वाच्च न्यायालयावर सर्वाच्च पदावर बसलेल्या न्यायाधीशांना असं म्हणणं हा कंटेट ऑफ कोर्ट आहे. जे संविधानाच्या रक्षनासाठी सर्वाच्च पदावर बसले त्यांच्याकडे हे यादवी पेटवतात असे बोट दाखवतात याला मुजोरी म्हणतात. असं म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.