
'शिक्षक समन्वय संघा'च्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांचं हुंकार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राज्यभरातील जवळपास 20 हजारांहून अधिक शिक्षक सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. ते आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.
गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूल कोसळल्याने अनेक वाहने नदीत वाहून गेली. गुजराच्या आनंद जिल्ह्यात ही घटना घडली. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती समोर आली नाही. प्रशासनाने या घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत कार्यास सुरुवात केली आहे. नदीत पडलेल्या वाहन चालकांना शोध सुरू आहे.
देशातील तब्बल 25 कोटी कामगार आज (बुधवारी) संपावर गेले आहेत. सरकारच्या कामगार, शेतकरी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी संप पुकारला आहे. शेतकरी संघटनांनी देखील या संपाला पाठींबा दिला आहे. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, महामार्ग, बांधकाम आणि इतर क्षेत्रातील कामागार संपावर गेल्याने या सेवांवर परिणाम होणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही दि. 10 जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदारा निवासात मुक्कामी आहेत. मंगळवारी रात्री आपल्याला निकृष्ट आणि शिळे जेवण दिल्याचे सांगत कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या कानाखाली तसेच त्याच्या ठोसा मारला. संतप्त झालेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला देखील धारेवर धरले.निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातून एका 16 वर्षीय मुलीवर धावत्या एक्सप्रेस गाडीत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या या अल्पवयीन मुलीला फूस लावून एका तरुणाने आपल्या गावी देण्याच्या बहाणाने इगतपुरी ते अकोलाच्या प्रवासादरम्यान अत्याचार केला. नंतर आरोपीने या मुलीला पुन्हा कल्याण रेल्वेस्थानक परिसरात आणून सोडले. पोलिसांनी ही पीडित मुलगी दिसल्याने तिची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.