Maharashtra Assembly Monsoon Session: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत; अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Assembly Session 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या सर्वांगीण विकसासाठी २४ हजार कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा केली.
Maharashtra Assembly interim Budget
Maharashtra Assembly interim BudgetSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याचा राज्यातील सुमारे 52 लाख 16 हजार 412 पात्र कुटुंबाना फायदा होणार आहे. महिलांना स्वयपांक करीत असताना इंधनाचा वापर करावा लागतो. त्यांना मदत व्हावी, यासाठी पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या सर्वांगीण विकसासाठी 24 हजार कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा केली.

महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिले पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली.

या योजनेचा राज्यातील 52 लाख 16 हजार 400 कुटुंबांना लाभ होणार आहे. त्यामाध्यमातून इंधनाची बचत होऊन पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना वारकऱ्यांच्या दिंडीसाठी आम्ही भरीव मदत दिली. दिंडीदरम्यान आम्ही वारकऱ्यांची तपासणी करू, असेही अजित पवार म्हणाले.

Maharashtra Assembly interim Budget
Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

त्यासोबतच राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येणार आहेत. यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासोबतच⁠ व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

राज्य सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

Maharashtra Assembly interim Budget
Maharashtra Budget 2024 Live : ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू; गाव तिथे गोदाम उभारणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com