Maharashtra Bangladeshi Infiltration : 'ममतां'च्या पश्चिम बंगालमधून बांगलादेशींना मिळते ओरिजनल 'आधारकार्ड'; गृह राज्यमंत्र्यांनी घुसखोरी मागील एजंटगिरीचं सर्वच काढलं

Maharashtra Home Minister Yogesh Kadam Legislative Assembly Bangladeshi infiltration West Bengal : महाराष्ट्रात बांगलादेशींची घुसखोरी पश्चिम बंगालमधून होत असल्याची गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती दिली.
Yogesh Kadam
Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Bangladeshi Infiltration News : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालमधून भाजप महायुतीचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात घुसखोरी होत असल्याची धक्कादायक माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

मंत्री कदम यांनी जवळपास 99 टक्के बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे तयार करून येतात. आता परिस्थिती एवढी गंभीर आहे की, त्यांना ओरिजनल आधारकार्ड देखील दिले जात आहे. त्यासाठी दलाल सक्रिय आहेत, अशी धक्कादायक माहिती दिली.

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून बांगलदेशी अन् रोहिंग्याच्या घुसखोरीवरून भाजप आक्रमक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या मुद्यावरून शिर्डीतील 'विजय अधिवेशना'त घुसखोऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला होता. भाजप किरीट सोमय्या यांनी तर संपूर्ण राज्यात या बांगलादेशी घुसखोरांविरोधात आघाडी उभारली आहे.

Yogesh Kadam
MLA Letter Mumbai BEST : 32 लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या 'बेस्ट'वर चर्चेसाठी 25 आमदारांना पत्र; पण विधिमंडळात चर्चा नाय

बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीवर विधानसभेत झालेल्या चर्चेत, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर धक्कादायक माहिती दिली. जवळपास 99 टक्के बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे तयार करतात. त्यासाठी दलाल सक्रिय आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. भाजपचे (BJP) संजय उपाध्याय यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

Yogesh Kadam
BJP Politics : दुबईला गेलेल्या संचालकांनी कल्पना चुंबळे यांना केले सभापती! नाशकात भाजपने टाकलेले फासे

मंत्री कदम म्हणाले, "पश्चिम बंगालमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, तिथे आधार कार्ड देखील अधिकृत तयार करून मिळतात. आधी कुटुंबातील एकजण येतो, मग नातेवाइकांना मागून पाठवून दिले जाते. घुसखोरी ही चिंतेची बाब असून, ती रोखण्यासाठी राज्य सरकार धोरणात्मक पावले उचलत आहे."

99 टक्के कागदपत्रे पश्चिम बंगालमध्ये

राज्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींना अटकेसाठी मोहीम सुरू असून, न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्यांना हद्दपार करण्यात येते. पश्चिम बंगालमधून ही घुसखोरी सुरू असून, काही एजंटच्या मदतीने त्यांना कागदपत्रे तयार करून दिली जात आहेत. 99 टक्के कागदपत्रे पश्चिम बंगालमध्ये तयार करून आणतात. महाराष्ट्रात त्यांना कागदपत्रे मिळत नाहीत. काही प्रकरणांत जन्म प्रमाणपत्रे ही महाराष्ट्रात काढल्याचे समोर आल्यानंतर नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले.

आमदारांकडून कारवाईची मागणी

भाजपचे अतुल भातखळकर यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन करा, डिटेन्शन कॅम्पचे काय झाले? अशी विचारणा केली. भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातही बांगलादेशी घुसखोर खोटे दाखले मिळवून राहतात, त्यांना चिपळूणमधून दाखले मिळालेत, हे निदर्शनास आणून दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' निर्माण करून कागदपत्रांवर निर्णय व्हावे, अशी मागणी केली.

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाया


महाराष्ट्राच्या इतिहासात बांगलादेशींवरील सर्वाधिक कारवाया मागील चार वर्षांत झाल्या आहेत. 2021 मध्ये 109 बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले. 2022 मध्ये 77, 2023 मध्ये 127, 2024 मध्ये 202 जणांना हद्दपार आणि 716 जणांना अटक करण्यात आली. यावर्षी मार्चपर्यंत 600 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com