महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून वाल्मिक कराडसह त्याचा मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यात सायको किलर गोट्या गीतेचा हात असल्याचा दावाही आरोप विजयसिंह बाळ बांगर याने केला आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून त्याचा मुलगाही चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यात भाषावाद पेटल्यानंतर तसाच वाद कर्नाटकात कन्नड आणि तुळ भाषेत पाहायला मिळाला होता. आता भाषा वादाची ठिणगी पश्चिम बंगालमध्येही पडली आहे. येथे मातृभाषेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. त्यांनी भाजपशासित राज्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांवर हल्ले होत असून नागरिकांना ताब्यात घेण्याचे निर्देश देणारी अधिसूचना गुप्तपणे काढल्याचा दावा केला आहे. तसेच यावरून भाजपाला इशारा देताना जर बंगालींना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवले, तर बंगाल भाजपला राजकीय डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवेल, असे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतच उद्धव ठाकरेंना सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली. यावरून राज्यात तर्क वितर्क काढले जात असून फडणवीस यांनी 2029 चा उल्लेख केल्याने युतीचे संकेत मिळत आहेत. यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी, हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होतात. त्या खेळीमेळीने घ्यायला हव्यात, असे म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत तीन मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. ज्यात कृषि अर्थव्यवस्था आणि अक्षय उर्जेच्या क्षेत्राला बुस्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान धन-धान्य कृषि योजना (PMDDKY), NTPC, NLC इंडिया लिमिटेड (NLCIL) यांचा समावेश आहे. याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करीचा भांगा फोड झाला असून एमडी ड्रग्स प्रकरणात खदान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांची नावं ही मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक मुस्ताक खान अशी आहेत. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलिस मित्र असल्याचे उघड झाले आहे. यामुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.