
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणांकडून सदस्य फॉर्म भरून घेणे चुकीचे आहे. ही योजना सरकारी आहे, असं शिरसाटांनी सांगितलं आहे.
पंचाचा निर्णय अनेकांना मान्य नसतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्रिपदावरून टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.एकनाथ शिंदे स्वतःही त्यांच्यासोबत असतील. राज्यात शिवजयंती साजरी झाल्यानंतर २० तारखेला मुहूर्त ठरवला जाणार. कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे शिवसेना आव्हान देणार आहे.
रत्नागिरी नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले आहे. पक्षाचे पाच नगरसेवक विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केल असून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. दुष्काळी भागाला पाणी देणे व्यवहार्य नाही, असे म्हणणाऱ्या जाणता राजा नेत्याला जनतेने डोक्यावर घेतले. त्यामुळे जाणता राजाला आता कळून चुकले आहे. दुष्काळी भागाला पाणी देता येते. नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला कधीच पाणी देता येत नाही, असा टोला मंत्री विखेंनी लगावला आहे.
'यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात 20 मुस्लिम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजुरी देण्यात आली. 31 मार्चपर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे', असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
दापोली नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहत आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेतील आऊटगोईंग काही केल्या कमी होताना दिसून येत नाही.
जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सोडून भाजपची साथ देणार असल्याच्या चर्चा आहे. जयंत पाटलांच्या संस्थेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत. त्यामुळे चर्चांना आता अधिक बळ मिळाले आहे. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावर जयंतराव कोणत्याही पक्षात जावोत, आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू, अशी भूमिका मांडली आहे.
फोडाफोडीचे राजकारण बस करा, जनतेचे प्रश्न सोडवा, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या धाराशिवचे आमदार कैलास पाटलांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सल्ला दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिक आहे. तो कसा फोडणार, नेते आणि पदाधिकाऱ्यांचे येणे-जाणे चालूच असते. कितीही दबाव टाकला तरी खरा शिवसैनिक फुटणार नाही, असेही कैलास पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर नकली सचिन तेंडुलकर असून एकनाथ शिंदे त्यांचे अंपायर आहेत, त्यांनी बोट वर केलं, तर कधीही त्यांची विकेट जाईल, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे राजेश वानखेडे यांनी लगावला.
जालन्यातील शासकीय कंत्राटदारांचे तब्बल ४०० कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका विकासकामांना बसण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा मागील काही महिन्यांपासून पीएफ जमा करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून महामंडळाने पीएफ जमा केला नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर पडलेल्या बोजाची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सपाटून मार खावा लागला. आता या सगळ्या गोष्टी मागे टाकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यामागे एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांची एसीबीकडून चौकशी सुरू होती. नाईक आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
अंजली दमानियांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचा आरोप. पुराव्यासह केली भांडाफोड.
राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शाहनिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी E-KYC करण्यात येणार आहे. गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूयात...
धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी परळीमध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांडावरून मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ग्रामस्थांनी तर कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करुन फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार केला जात असून सुरेश धस मुख्य सूत्रधार मुंडे यांच्या भेटीला गेल्याने संशय निर्माण होणारच असे म्हटलं आहे. तसेच बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करतयं, हे धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावं, असे आवाहन केलं आहे.
राज्यात सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहेत. यावरून ठाकरे गटाने टीका केली आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी, शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातोय. पैशाचे आमिष दाखवले जातयं असा दावा केला आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, आम्ही कुणालाही बोलवत नाही, लोक स्वतःहून आमच्या पक्षात येत आहेत. मोदींकडे पाहून लोक भाजपमध्ये येत असून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा संकल्प आपला असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. पण आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करुन फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. यामुळे त्यांचे आज (17 फेब्रुवारी) दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणी घ्यायचा हे आधी ठरवलं पाहिजे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत यांनी न्यू इंडिया बँकेवरून देखील भाजपवर टीका केलीय. न्यू इंडिया बँक लुटली, यात सगळे भाजपचे लोक असून मुलुंडचा पोपटलाल आता कुठे गेलाय? असा टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी गळती लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर राज्यात जोरदार सुरू असून शिवसेनेत उबाठाचे अनेक नेते प्रवेश करत आहेत. यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता कामाला लागले असून ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक येत्या 20 आणि 25 तारखेला होणार आहे.
राज्यात सध्या ऑपरेशन टायगरमधून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली जातेय. यावरून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख आरोप केला आहे. त्यांनी, ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. संघटना मोठी केली. पण आत शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातोय. पैशाचे आमिष दाखवले जातयं असा दावा खासदार देशमुख यांनी केला आहे.
लाडक्या बहिणी, शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थींना देखील भाजपचे सभासद करून घ्या, यासाठी विशेष लक्ष द्या, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. त्यांनी हे आदेश कोल्हापूर येथे आयोजित संघटन पर्व कार्यशाळेत दिले आहेत.
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 भाविकांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. प्रयागराज येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने प्रयागराज संगम स्टेशन 28 तारखेपर्यंत बंद केले आहे. याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.
शिंदे गटाच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षातून गळती थांबण्याचे नाव घेत नाही, या पार्श्वभूमीवर पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलवली आहे. येत्या 20 तारखेला खासदार, तर २५ तारखेला आमदारांची बैठक शिवसेना भवनात होणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचा निर्णय आज होणार आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काही नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. अंतिम नाव आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे.
राज्यात आज सर्वत्र शिवजंयती साजरी होत आहे. अशातच वाईट बातमी समोर येत आहे. मनमाड-नांदगाव रस्त्यावर ही घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पोलवर शिवजयंतीसाठी क्रेनवरून झेंडे लावत असताना काळाने दोन जणांवर घाला घातला. ट्रकने क्रेनला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला.या अपघातात 4 जण जखमी आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव निगडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश केला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी झालेल्या या प्रवेशांमुळे शशिकांत शिंदे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील सरपंच, उपसरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.