

नागपुरात दिवसभर आभाळ आणि रिमझरी पावसाच्या सरींनंतर जोरदार पावसाला सुरुवात. शहरातील अनेक भागात पावसाला सुरवात झाली. आज विदर्भातील वर्धा जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं. आज उद्याही हवामान विभागाने यलोअलर्ट दिला असून पावसाचा अंदाजही व्यक्त केला होता. यवतमाळ-भंडारा-अमरावती भागात पुढील काही तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यातील नाना पेठेत गोळीबारात खून झालेल्या आयुष कोमकरच्या आई आणि भावाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आई म्हणाली, माझ्याच लोकांनी का असं केलं, हे काही कळत नाही, त्यांनी आयुषच्या थेट घशातच गोळी मारली. असं काही कांड करण्याआधी आंदेकर हे बाहेर जातात, असा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणात पोलीस देखील सहभागी असल्याचा धक्कादायक दावाही मयत आयुषच्या आईकडून करण्यात आला आहे.
मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीबाबत माहिती दिली आहे. यावेळी शेलार यांनी मुंबई शहरातील म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले असतानाही विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या 25 हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आता व्हॉट्सअपवर 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना मिळण्यास सुरुवात होणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीची संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
13 सप्टेंबरपासून हडपसरपासून सुरू होणाऱ्या ‘जनसंवाद’ अभियानात सहभागी व्हा. तुमच्या समस्या 7888566904 वर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करून नोंदवा. कार्यक्रमात अधिकारी थेट तुमच्याशी संवाद साधतील.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" अंतर्गत पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी या निर्णयासंदर्भातील घोषणा आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन केली आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चांगलाच तापला आहे. ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की फक्त प्रतिज्ञापत्र दाखवून मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेता येणार नाही. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि ठोस पुरावे दाखवणे आवश्यक आहे. भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होत असून राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, समग्र नावाच्या संस्थेसोबत नवीन करार झाले आहेत. कोकण विभागातील डेटा सेंटरमध्ये दोन विभागांसाठी करार करण्यात आले असून, टप्प्यांनुसार सेवा देण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या प्रकल्पासाठी 35 हजार कोटींची मोठी गुंतवणूक होणार आहे. नाशिक आणि विदर्भमध्येही विविध करार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या करारांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. मुख्यमंत्री म्हणाले की, हे पाऊल राज्याच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल आणि युवकांना संधी उपलब्ध होतील.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर संवाद साधला. त्यांनी पर्यटकांना दिलासा देत सांगितले की, राज्य शासन आणि केंद्र सरकार मिळून सर्वतोपरी मदत करत आहेत. पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी आश्वासन दिले.
मंत्री छगन भुजबळ आज दुपारी साडेतीन वाजता तातडीची पत्रकार परिषद घेणार आहेत. मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेट आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका या परिषदेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवर भुजबळ काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी दोन ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यापाठोपाठ आता एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशाथ चॉकलेट अडकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, चिमुकलीच्या कुटुंबीयांना आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
नागपूरच्या कडबी चौकात मोठी घटना घडली असून दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटल्याची बातमी समोर येत आहे. हल्लेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार करत 50 लाख रुपये लुटले. या घटनेत व्यापारी जखमी झाला असून या घटनेमुळे नागपूर हादरले आहे. तर राजू दिपानी असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे.
बीड जवळील इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. तर मुलीचा शोध सुरू होता. मात्र आज ही चिमुकली गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे बीडमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या हत्येनंतर आता याची चर्चा सुरू झाली आहे. बर्गे यांनी स्वत: आपल्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. पण ही आत्महत्या नसून तो घातपात असल्याचा दावा बर्गे यांच्या भाच्याने केल्याने खळबळ उडाली होती. या दरम्यान आता या मागिल खरे समोर आले असून ते कला केंद्रातील नर्तकी पूजासोबत उपसरपंचाचे प्रेमाचे सूत आहे. तर नर्तकीकडून केलेल्या गेवराईतील आलिशान घराची मागणी हेच या उपसरपंचाच्या मृत्यूचे कारण ठरले का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत मोठी दुर्घटना घडली. ही घटना जुन्नर शहरात घडली असून यात डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी होते. यावेळी ढोल-ताशा पथकातील तरुणाचा गाडी खाली चिरडून मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.
काल राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर आज मुंबईत मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकींवर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर ही बैठक होत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज ७५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून अनेक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा देत विशेष संदेश दिला असून, त्यासोबत एक लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे 'एक्स' अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरने अर्थात एक्सने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने अकाउंट सस्पेंड झाल्याचे माहिती आहे.
नेपाळबाबत अभिनेता किरण माने यांनी केलेली पोस्ट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्ट विरोधात भाजप आक्रमक झाला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेपाळ संबंधित पोस्ट करत भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी ही फेसबुक पोस्ट असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.
नेपाळमधील हिंसाचारानंतर काठमांडू विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी एअर इंडियाचे विमान १२३ भारतीय प्रवाशांसह दिल्लीला रवाना झाले. नेपाळमधून भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे.
पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आयुष कोमकर यांची गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हत्या करण्यात आली होती.
बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे पथकाने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार अंजना विभीषण नागरगोजे (वय 38 वर्षे, ब.नं. 2309, पुणे ग्रामीण पोलीस) यांना ₹20,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.