Maharashtra budget 2024 : शिंदे सरकारने अर्थसंकल्पात युवकांना काय दिले? 'या' मोठ्या योजनेची घोषणा

Maharashtra assembly session : दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार आहे.
Ajit Pawar on Maharashtra Budget 2024
Ajit Pawar on Maharashtra Budget 2024Sarkarnama

Monsoon session : राज्यभरात विविध शैक्षणिक संस्थातून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात. त्यासोबतच डिप्लोमा करणारे विद्यार्थी त्यांनी औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळू शकतो. दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिले जाणार आहे. असल्याची घोषणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प (Maharashtra budget) सादर करताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. येत्या काळात विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात येईल. शासनाच्या योजनांची जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे, येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. त्यासोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar on Maharashtra Budget 2024
Ajit Pawar Maharashtra Budget 2024: शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बजेटमधील महत्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना वीज बिल माफ

2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे मुंबई गोवंडी येथे कार्यालय रोजगार केंद्र उभारण्यात आलेले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाची काम करण्यासाठी सारथी, बार्टी तसेच इतर सामाजिक संस्थांना भरीव अनुदान देण्यात येईल.

2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. मुंबई गोवंडी येथे कार्यालय रोजगार केंद्र उभारण्यात आलेले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाची काम करण्यासाठी सारथी, बार्टी तसेच इतर सामाजिक संस्थांना भरीव अनुदान देण्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली.

Ajit Pawar on Maharashtra Budget 2024
Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

उद्योजकता विकास कार्यक्रम राबविणार

त्यासोबतच येत्या काळात मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान व कौशल्य विकास प्रकल्पा अंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जाला तसेच मॉडेल आयटीआय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ एका सेंटर अशा विविध संस्थांत उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com