Maharashtra Cabinet portfolio distribution: राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला मुहूर्त लागला; देवेंद्र फडणवीसांनी गृह सोडलेच नाही; शिंदेंकडे....

Political News : शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले. त्यामध्ये फडणवीस यांनी स्वतःकडेच गृह खाते ठेवले आहे.
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर बहुमत मिळालेल्या महायुतीने सत्तास्थापन केली. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार दहा ते 12 दिवस रखडला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सात दिवस खातेवाटप करण्यात आले नव्हते. शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले. त्यामध्ये फडणवीस यांनी स्वतःकडेच गृह खाते ठेवले आहे. त्यासोबतच ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते त्यांच्या कडेच असणार आहेत.

महायुती सरकारच्या खातेवाटपात फक्त शिवसेना व भाजपमधील एका खात्यात बदल करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या वर्षभरात असलेले खाते तसेच ठेवण्यात आले आहेत. भाजपने शिवसेनेला गृह खाते न सोडता त्या बदल्यात गृहनिर्माण हे एकमेव खाते दिले आहे.

त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल तर गिरीश महाजन व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पूर्वीचे जलसंपदा खाते विभागून देण्यात आले आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे-कृषी, गणेश नाईक - वन, खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला 24 तास पूर्ण होण्याआधीच अविनाश बारगळांची बदली, आता 'हे' असणार बीडचे नवे पोलिस अधीक्षक

'या' मंत्र्यांकडील खाते बदलले नाहीत

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री, गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा, मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल, अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरन, अदिती तटकरे - महिला व बालविकास.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder Case : CM फडणवीसांनी आरोपींना शिक्षा करण्याची घोषणा करताच, संतोष देशमुखांच्या मुलीने केली 'ही' मोठी मागणी

'या' मंत्र्यांकडील खाते बदलले

राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास), गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन, दादा भुसे - शालेय शिक्षण, संजय राठोड - माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय,

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder Case : कोणाला तरी वाचवण्याच्या नादात SIT, न्यायालयीन चौकशीचा घाट; जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात 'राजकारण' सांगितलं

नव्या मंत्र्यांकडे दिली 'ही' जबाबदारी

चंद्रशेखर बावनकुळे - महसूल, गणेश नाईक - वन, पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन, अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय, आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले- सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे-कृषी, जयकुमार गोरे -ग्रामविकास, पंचायत राज, नरहरी झिरवाळ-अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे-वस्त्रोद्योग, संजय शिरसाट-सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक-परिवहन, भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन, नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर - कामगार,  बाबासाहेब पाटील - सहकार, प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण.  

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे यांना कोण वाचवत आहे?

राज्यमंत्र्यांवर सोपवली ही जबाबदारी

माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम  - गृहराज्य शहर. पंकज भोयर - गृहनिर्माण,

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Sharad Pawar Visit Massajog : दहशतीतून बाहेर पडा, सगळे मिळून परिस्थितीला तोंड देऊ..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com