
Mumbai News : नुकसाच प्रदर्शीत झालेल्या छावा चित्रपट आणि सपा आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब याच्या गौरावाचे उद्गागारानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता औरंगजेबची कबरच हटवण्याची मागणी भाजपसहित अनेक हिंदू संघटना करताना दिसत आहेत. याचबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील ही कबर उखडून टाका अशी मागणी केली होती. तसेच मंत्री नितेश राणे यांनी देखील औरंगजेब कबर महाराष्ट्रात किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल, असे संकेत दिले आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील औरंगजेबच्या कबरीवरून वक्तव्य केलं आहे. ते श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
जुलमी मुघल शासक अशी ओळख असलेल्या औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. औरंगाबादजवळ खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होत आहे. औरंगजेबच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
औरंगजेबची कबर हटवण्याची मागणीला जोर धरत असतानाच फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगजेबच्या कबरीबाबत अशी मागणी झाली नव्हती. पण आता पुन्हा एकदा या मागणीसाठी जोर वाढला आहे. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी ऐनवेळी औरंगजेबावर स्तुती सुमनं उधळल्याने याचा वाद आणखीन वाढला आहे. आझमींच्या कृतीमुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून आझमींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याचदरम्यान फडणवीस यांनी कबरीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी राज्यातील प्रत्येकाला औरंगजेबची कबर हटवली पाहिजे असेच वाटते. पण काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. त्या झटकनं होत नाहीत. औरंगजेबच्या कबरीला काँग्रेसने सरंक्षण दिले. तर ती काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी करताना काँग्रेसवरच खापर फोडलं आहे. तसेच ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली सध्या असल्याचेही फडणवीस यांनी सांगत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे आता काँग्रेस या आरोपांवर कसे उत्तर देते हे देखील पाहावं लागणार आहे.
तसेच या कबरीला कायदेशीर संरक्षण असून ते विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलावं लागतं. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी देखील या कबरीवरून सूचक वक्तव्य करताना, ही किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.