Maharashtra Education: दांडी बहाद्दर प्राध्यापकांची आता होणार बायोमेट्रीक हजेरी; नवीन शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी

Maharashtra college professors to mark biometric attendance starting this academic year: विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या आवडीनिवडींना प्राधान्य देण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर काँलेजमधील विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित व्हाव्यात, यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे.
Maharashtra college professors   biometric attendance
Maharashtra college professors biometric attendanceSarkarnama
Published on
Updated on

Pune News: दांडी बहाद्दर विद्यार्थ्याना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकारनं यंदापासून बायोमेट्रीक हजेरी घेणार आहेत. अशाच प्रकारचा नियम आता प्राध्यापकांनाही लागू करण्यात येणार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा नियम लागू करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पदवी आणि पदव्युत्तर काँलेजमध्येही सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्यांच्या आवडीनिवडींना प्राधान्य देण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर काँलेजमधील विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित व्हाव्यात, यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे.

Maharashtra college professors   biometric attendance
वा रे पठ्ठ्या! 31 वर्षांपूर्वी बापानं JEEचे पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण; रजित गुप्ता देशात पहिला; काय आहे यशाचं गुपित

याशिवाय प्राध्यापकांची वर्गातच बायोमेट्रीक हजेरी नोंदवली जाईल, त्यामुळे दांडीबद्दादर विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकांच्या हजेरीवर काँलेज प्रशासनाचे लक्ष असणार आहे. प्रत्येक विषयांचा तासासाठी विद्यार्थी उपस्थित राहतात का? प्राध्यापक किती वेळ वर्गात असतात, हे विद्यापीठातील कुलगुरुंसह त्या-त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना समजणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Maharashtra college professors   biometric attendance
Mamata Banerjee: ममतादीदींनी करुन दाखवलं, विधानसभेपूर्वी खेळलं OBC कार्ड; देवाभाऊ असा निर्णय घेतील का?
  • प्राध्यापकांची हजेरी त्यांच्या क्लासरूममध्ये नोंदविली जाणार आहे. त्याची सुरवात विद्यापीठापासून होणार आहे.

  • कुलगुरू त्यासंदर्भातील अभ्यास करून अहवाल देण्यासाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात येणार आहे.

  • समितीच्या अहवालानंतर त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे.

  • प्राध्यापकांना नवीन बदलानुसार पहिल्या तासाला व शेवटच्या तासाला हजेरी नोंदविण्यात येणार आहे.

  • २०२६-२७ पासून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com