
Maharashtra Floods: महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसामुळं महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पाऊस सुरु आहे. त्यातच आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तब्बल राज्यातील ३१ जिल्हे म्हणजेच जवळपास ९७ टक्के महाराष्ट्रातील नागरिकांनी यानिमित्त काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात केवळ शेतातील उभी पिकंच नव्हे तर लोकांची घरंही वाहून गेली आहेत. मोठ्या प्रमाणावर जनावरं दगावली आहेत. या बिकट परिस्थितीतून अजून या भागातील नागरिक सावरलेले नाहीत. त्यामुळं येत्या रविवारी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा देखील आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा पुढील महिन्यात ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
तसंच शासनाकडूनही नुकसानीचं पंचनामे करण्याचं काम सुरु असून लवकरच केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य शासनाकडून मोठी मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. कारण परवा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारमधील तीनही प्रमुख मंत्र्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महापुराचा आढावा घेतला. त्यानंतर कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला केंद्राकडं मदत मागण्यासाठी रवाना झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.