मोठी बातमी : राज्यात आता २ डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार

ग्राहकांने मास्क घातला नसल्यास संबंधित दुकानदाराला १० हजार रुपये दंड
cm Uddhav Thackeray
cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राज्य सरकारने कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी मोठा निर्णय जाहिर केला आहे. यानुसार राज्यात आता लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर केवळ दोन डोस घेतलेल्यांना परवानगी असणार आहे. लसीकरणाबाबत नवी नियमावली (New rule for covid19 vaccination) प्रसिद्ध करत राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.

तसेच या नियमावलीअंतर्गत कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने आता मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला ५०० रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तर दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला ५०० आणि संबंधित दुकानदाराला १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

याशिवाय राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. ३ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीसही परवानगी देण्यात आली आहे.

cm Uddhav Thackeray
अजितदादांची मोठी घोषणा : १ डिसेंबरपासून पुणे संपुर्ण अनलॉक

दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हेरिऐंटमुळे केंद्र आणि राज्य सरकार हायअलर्टवर

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाचा (Covid 19) नवा व्हेरिऐंट आढळला आहे. हा व्हेरिऐंटची दाहकता गंभीर असल्याचा इशारा 'एम्स'ने दिल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार हायअलर्टवर आहे. तसेच याच व्हेरिऐंटमुळे जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (3rd Wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

cm Uddhav Thackeray
आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानसेवा बंद करा, आरोग्यमंत्र्याची केंद्राकडे मागणी

या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव आणि कोविड टास्क फोर्सच्या (Covid Tast Force) प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात कोरोना परिस्थितीचा आढावा, आणि दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिऐंटवर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही दक्षिण आफ्रिकेतून भारतात (India) होणारी विमानवाहतूक (Air transport) बंद करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com