आफ्रिकेतुन महाराष्ट्रात होणारी विमानसेवा बंद करा, आरोग्यमंत्र्याची केंद्राकडे मागणी

आफ्रिकेतून नव्या व्हेरीयंटची बातमी समोर आली आहे
Rajesh Tope
Rajesh Tope
Published on
Updated on

जालना : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा (Covid 19) नवा व्हेरियंट आढळला असून त्यामुळे जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (3rd Wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर दक्षिण आफ्रिकेतून भारतात (India) होणारी विमानवाहतूक (Air transport) बंद करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे, तोच आफ्रिकेतून नव्या व्हेरीयंटची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळला असला तरी अद्याप भारतात या व्हेरीयंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून भारतात होणारी विमान वाहतूक रद्द करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

Rajesh Tope
'2 वर्षांपासून आम्ही पुन्हा येऊ म्हणणारे आता थकलेत!'

राजेश टोपे यांनी जालन्यात बोलताना ही माहिती दिली आहे. सध्या विमान तळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मॉनिटरींग होत असून स्वाईप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू असून या व्हायरंटपासून राज्य सरकार खबरदारी घेत आहे. विमान प्रवासासाठी 72 तास आधीचे कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. विमानतळावर कडक तपासणी केली जात आहे. क्वारंटाईन करण्याचा नियम करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आले आहे. केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा, असंही टोपे म्हणाले.

येत्या बुधवारपासून (1 डिसेंबर) राज्यांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याबाबत उद्या (28 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आरोग्य विभागांच्या अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक होणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा सुरु होण्याच्या निर्णयावर संभ्रम निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com