Maharashtra MLA Salary : महाराष्ट्रातील आमदारांच्या पगारात भरघोस वाढ : अर्थ खात्याकडून फाईल मंजूर; पीए, वाहनचालकांना होणार लाभ

Maharashtra MLA Salary : महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या स्वीय साहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ केली आहे.
Assembly Deputy Speaker Post
Assembly Deputy Speaker PostSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLA Salary : महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या वेतनवाढीचा थेट फायदा आमदारांचे स्वीय साहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांना होणार आहे. स्वीय साहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे.

आमदारांच्या एकूण वेतनामध्येच स्वीय सहाय्यक भत्ता आणि वाहनचालक भत्ता देण्यात येतो. वाढती महागाई, मतदारसंघातील वाढलेला कामाचा ताण याचा स्वीय साहाय्यक आणि वाहन चालक यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदारांच्या वेतन आणि विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी सुरु होती.

या मागणीनुसार संसदीय कामकाज विभागाने संबंधित प्रस्ताव तयार करून तो अर्थ विभागाकडे पाठवला होता. आता हा प्रस्ताव मंजूर झाला असून स्वीय साहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले आहे. या दोन्ही भत्त्यांमध्ये वाढ झाल्याने महाराष्ट्रातील आमदारांच्या भत्त्यामध्ये २० हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Assembly Deputy Speaker Post
Ritu Tawde : मुंबईकारांचा पैसा प्रसिद्धीसाठी उडवणार! महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडियासाठी 25 लाख खर्च करणार? खरं काय ते स्वतःच सांगितलं

दरम्यान, ही वाढ एक ऑगस्टपासून लागू करण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, विधिमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६ मधील विद्यमान सदस्यांना त्यांचे विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी स्वीय साहाय्यकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

Assembly Deputy Speaker Post
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज'ला अखेर पोलिसांची परवानगी; 30 कडक अटींचा फास; काय आहेत नियम?

सदस्यांच्या वेतन व भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार स्वीय साहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार स्वीय साहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा महत्त्वाचा भाग सांभाळणाऱ्या स्वीय साहाय्यक आणि वाहनचालकांना वाढीव मानधन मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com