रक्षाबंधनाच्या तोंडावर सरकारने 26 लाख लाडक्या बहिणींची ओवाळीच थांबवली? अपात्रतेची कारवाई करत दिला झटका

Mahayuti Government : नुकताच महायुती सरकराने आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. योजनेतील चाळण थांबवली होती. पण पुन्हा एकदा सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा धक्का दिला आहे.
Ladki Bahin Yojana Mahayuti Government
Ladki Bahin Yojana Mahayuti Governmentsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी पुन्हा सुरू करत 26 लाख 34 हजार महिलांना अपात्र ठरवले आहे.

  2. या महिलांचा मोबदला थांबवण्यात येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे रक्षाबंधनपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

  3. या निर्णयावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, यामागे निवडणूकपूर्व रणनीती असल्याचा आरोप केला आहे.

Pune News : आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा देणारा निर्णय राज्यातील महायुती सरकराने घेतला होता. सरकारने योजनेसाठी लावलेल्या पडताळणी चाळण थांबवली होती. तर निवडणुकीपर्यंत लाभार्थ्यांना मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पुन्हा एकदा सरकराने लाडक्या बहिणींना दणका देत जवळपास साडे सव्वीस लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत. तसेच यांना मिळणारा योजनेचा मोबदला देखील थांबण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे रक्षाबंधणाच्या तोंडावरच लाडक्या बहिणींची ओवाळणी सरकारने काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून विरोधकांनी देखील टीका करणे सुरू केले आहे. (Maharashtra government disqualifies 26 lakh women under Ladki Bahin scheme)

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. सरकारी महिलांचा समावेश, एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणार्या महिला, एकाच कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी आणि आत्ता सापडलेले 14 हजार पेक्षा पुरूष लाभार्थी यामुळे या योजनेवरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. त्यातच जून महिन्याचा हफ्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. यामुळे पुन्हा एकदा सरकार अडचणीत आले आहे.

Ladki Bahin Yojana Mahayuti Government
Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजनेवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ, सरकारला 21कोटीला गडवलं

या दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्यामधील लाभार्थी महिला आणि अपात्र महिलांची संख्या जाहिर केली आहे. महिला व बाल कल्याण विभागाने जून महिन्यामधील लाभार्थी महिला आणि अपात्र महिलांची संख्या जाहिर करताना, किती महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आणि किती महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले याची माहिती दिली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे जूनचा हफ्ता ज्या लाडकींच्या खात्यावर जमा झाला नाही त्या नाराज झाल्या आहेत.

राज्य सरकारने अपात्र ठरवलेल्या या सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे. सरकारने जून महिन्यामध्ये जवळपास 2 कोटी 25 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे भरले आहेत. मात्र 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळाला नव्हता. याची पडताळणी केली असता त्या विविध कारणांनी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana Mahayuti Government
Ladki Bahin Yojana : नाराज लाडक्या बहि‍णींना फडणवीस सरकारचा दिलासा; जुलै महिन्याचे पैसेही मिळणार अन् निवडणुकीपर्यंत पडताळणीही थांबणार

FAQs :

1. लाडकी बहीण योजनेतून किती महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे?
– जवळपास 26 लाख 34 हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

2. योजनेचा मोबदला आता मिळणार नाही का?
– अपात्र ठरवलेल्या महिलांचा मोबदला थांबवण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

3. हे निर्णय रक्षाबंधनाच्या आधी का घेतले गेले?
– सरकारने पूर्वी चाळणी थांबवली होती पण आता ती पुन्हा सुरू केली असून यामुळे वेळेच्या बाबतीत टीका होत आहे.

4. विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
– विरोधकांनी हे सरकारचं दुटप्पी धोरण असल्याचं म्हणत टीका केली असून महिलांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे.

5. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होईल?
– महिलांमध्ये संताप वाढण्याची शक्यता असून, स्थानिक निवडणुकांवर परिणाम होण्याचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com