Maharashtra Live Updates : सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी घेतली अमित शाह यांची भेट

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Amit Saha-Supriya Sule
Amit Saha-Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी घेतली अमित शाह यांची भेट

खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण समजू शकले नाही.

महाराष्ट्राचं डिजिटल परिवर्तन

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी गुरुवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध विषयांवर सकारात्मक आणि धोरणात्मक चर्चा झाली. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून महाराष्ट्राला डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये देशात मॉडेल बनविण्यासाठी गेट्स फाऊंडेशन आणि मायक्रोसॉफ्टकडून सहकार्य करण्याचा यावेळी निर्णय झाला.

दिशा सालियान प्रकरणाशी काहीही संबंध नाही : उद्धव ठाकरे

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. दूर दूर त्याच्याशी संबंध नाही. आमच्या घराण्याच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर आहेत. पण, वाईट दिशेला राजकारण न्यायचं असेल, तर मग सर्वांची पंचायत होईल. तुम्ही खोट्याचा नायटा कराल, तर बुमरँग तुमच्यावरच होईल, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

Anil Parab speech : सरडाही लाजला!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब हे आज विधान परिषदेत आमदार मनिषा कायंदे यांच्यावर चांगल्याच भडकल्या. मनिषा कायंदे यांचे दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ केलेले ट्विट परब यांनी सभागृहात वाचून दाखवले. आता त्यांचे उपसभापतींच्या खुर्चीकडे लक्ष आहे. त्या सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत, अशी जोरदार टीका परब यांनी केली. सरडाही लाजला, असा टोलाही त्यांनी लगावला.

Amit Shah Update : 22 नक्षलवाद्यांचा खात्मा

 छत्तीसगढमधील बीजापूर आणि कांकेर मध्ये सुरक्षा यंत्रणांच्या दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. पुढील वर्षी देश ३१ मार्चपूर्वी नक्षलमुक्त होणार आहे, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

Ram Sutar : राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. राम सुतार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिध्द शिल्पकार आहेत. पालघरमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा राम सुतार यांच्याकडून तयार केला जात आहे.

आदित्य ठाकरे आणि सुरज पांचोली त्यादिवशी दिशाच्या फ्लॅटवर होते - वकीलांचे आरोप

सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे प्रतिज्ञापत्र खोटे आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिशा सालियानच्या वडिलांचे वकील अॅड. ओझा यांनी केली आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि सुरज पांचोली त्यादिवशी दिशाच्या फ्लॅटवर होते, असेही ओझा यांनी सांगितले.

नागपूर दंगलीची राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून दखल

नागपूर येथील दंगलीची राज्य अल्पसंख्यांक आयोगाने दखल घेतली आहे. या दंगलीबाबत चर्चा करण्यासाठी आयोगाने बैठक बोलावली आहे.

आदित्य अन् उद्धव ठाकरेंना अटक करा, नितेश राणेंची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्याचे आरोप असतील तर संबंधित व्यक्तीला अटक करून चौकशी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चौकशी करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्राचे विधिमंडळ नियमांनुसार चालत नसल्याची तक्रार करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. सत्ताधाऱ्यांकडे अजेंडा राहिलेला नाही. सत्ताधारी सभागृहाचा अपमान करत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दिशा सालियान प्रकरणी विधानसभेत घमासान

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजप आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. या प्रकरणाची चौकशी करावी, आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चौकशी करा अशी मागणी करत भाजप आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.

नितेश राणे यांचे मंत्रिपद जाणार?

द्वेषपूर्ण बोलणे, विषमता तयार करणे, जाती-धर्मात तेढ निर्माण करणारी विधाने करणे यातून नितेश राणे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे व आमदारकी रद्द करावी अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात येणार आहे. ॲड.असीम सरोदे यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहेत.

Satish Bhosale:  शिरुर सत्र न्यायालयात सुनावणी

ढाकणे पिता-पुत्राला मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिरुर सत्र न्यायालयात याची सुनावणी आहे.

Satish Bhosale:  पहिली सुनावणी, राज्याचे लक्ष

भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या याची सात दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. शिरूर न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे. शिरूर पोलीस ठाण्यासह चकलांबा पोलीस ठाण्यात त्याच्यावर खोक्या विरोधात गुन्हा दाखल आहे. न्यायालय आज काय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

IPS Rashmi Karandikar : आयपीएस रश्मी करंदीकर यांच्या अडचणीत वाढ?

आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावला आहे. रश्मी करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. पती-पत्नीमधील आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी केली जाणार आहे. त्याबाबतच त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत.

Nagpur Violence News : नागपूर हिंसाचारप्रकरणी मोठी अपडेट्स, दंगलीत बांग्लादेश कनेक्शन

नागपूर हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात दोन समाजांना भडकावणारे भाषण केल्याचा गुन्हा नोंद आहे. यानंतर आता नागपूर हिंसाचारप्रकरणी मोठी अपडेट्स समोर आली असून पोलिसांनी दंगली मागे बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी काही पोस्ट बांग्लादेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Prashant Koratkar News : प्रशांत कोरटकर अद्यापही फरारच..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते. मात्र तो अद्यापही फरार असून कोल्हापूर पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी नागपुरात तळ ठोकून आहेत.

MVA News : राज्यपालांची भेट घेणार महाविकास आघाडीचे नेते

विधानपरिषदेत नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेत्यांनी केला आहे. या आरोपावरून आज (ता.20) सकाळी 11.30 वाजता मविआचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. तसेच नागपूर घटनेप्रकरणीही महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Santosh deshmukh case News : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण, आंधळेचा शोध लागेना

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 100 दिवस पूर्ण झाले. मात्र अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेत असून बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केल आहे. आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीसही घोषित करण्यात आलं आहे.

Disha Salian death Case : दिशा सालियनच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा दावा करताना तिच्या वडिलांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा, अशा याचिका न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर आता दिशा सालियनच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

NCP Politics News : अजित पवार पक्षाच्या नेत्याची नाशिकमध्ये चॉपरने हत्या

नाशिक शहरात गेले काही दिवस गुन्हेगारीचा हा लेख सतत चढता आहे शहरात अनेक ठिकाणी कोयता यांचा उपद्रव वाढत आहे. आतातर शहरातील बजरंग वाडी परिसरात सशस्त्र टोलक्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावावर हल्ला केला. चॉपर आणि धारदार शस्त्राने झालेल्या या हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य व 12 सरपंचांना झटका, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य व 12 सरपंच अपात्र ठरले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरन पूजार यांच्या आदेशानुसार हे आदेश काढले आहेत. तर ही कारवाई जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेली आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असून 9 जुलै 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश होते.

Disha Salian death Case : "दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न?"; नितेश राणेंचा आरोप

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांत आदित्य ठाकरेंचं नाव घेण्यात आल्याने भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियन प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com