Tamil Nadu CM Oath Ceremony Live : अखेर संख्याबळाचा तिढा सुटला, थलपती विजय आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार

Marathi Breaking News : टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार, यासह आज रविवार दिनांक १० मे रोजीच्या राज्य आणि देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

रूपाली चाकणकर आज आएसआयटीसमोर हजर राहणार

माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज आएसआयटीसमोर हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कान्हा व्याघ्र प्रकल्पात एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील 'कान्हा' व्याघ्र प्रकल्पात 'केनाईन डिस्टेंपर वायरस' मुळे एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील ज्या 'सरही' सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे, तिथे पाच वर्ग किलोमीटरचा भाग 'नो गो झोन' करण्यात आला आहे.

विजय यांच्या शपथविधीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार

काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विजय यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. यासाठी ते चेन्नईत दाखल झाले आहेत.

Tamil Nadu Government Formation : अखेर संख्याबळाचा तिढा सुटला, थलपती विजय आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन १२१ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सोपवल्यानंतर विजय यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार रविवारी (ता.१०) सकाळी दहा वाजता विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्यांना १३ मे पूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com