

नव्याने उभारण्यात आलेल्या ईएसआयसी कामगार रुग्णालयाचीही पाहणी करण्यात आली. सध्या १०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयाची क्षमता वाढवून २५० ते ३०० खाटांपर्यंत नेण्याचे नियोजन असून, त्यासाठी अतिरिक्त मजला उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील सहा महिन्यांत हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून, एमआरआय, सीटी स्कॅन, कॅथलॅबसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचारही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.याच दौऱ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर महापालिकेने उभारलेल्या नव्या अग्निशमन केंद्राचे, तीन शाळांचे आणि एका अभ्यासिकेचेही लोकार्पण करण्यात आले.
सांगलीच्या कृष्णा घाटावर तरुणाचा नामचीन गुंडांच्या टोळीने थरारक पाठलाग करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. चेतन सुहास तोरणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चेतन तोरणे याचा गुंडांच्या टोळी सोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून सराईत गुन्हेगारांची टोळी चेतन तोरणे याच्या मागावर होती. चेतन तोरणे हा कृष्णा घाटावर आल्याची माहिती संबंधित टोळीतील गुन्हेगारांना मिळाली. त्यानुसार टोळीतील सात ते आठ जणांनी कोयता घेऊन त्याचा थरारक पाठलाग सुरू केला. यावेळी चेतन तोरणे याच्यावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. दरम्यान टोळी युद्धातून हा खून झाला असून हल्लेखोरांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
महावितरणच्या गलथान कारभार,पूर्वकल्पना न देता तासतास मनमानी पद्धतीने वीज पुरवठा खंडित होणे व कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष जात असल्याने नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक व माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
'पॅराक्वाट' (Paraquat) हे तणनाशक अतिप्रमाणात विषारी असून मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे समोर आल्याने केंद्र सरकारने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे तणनाशकाचा भात आणि गव्हाच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीये. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचं काम आम्ही करणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून कायद्यानं आपलं काम केलं आहे. डॉक्टरांवरील हल्ला अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज मोठी कारवाई केली. थेट पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या संशयितांवर दहशतवाद विरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी धाड टाकली. या धाडसत्रात आतापर्यंत तब्बल 45 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. विषय पत्रिकेत विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यामुळे शिवसेना नगरसेवकाने माईक फेकून दिला.त्यामुळे आयुक्त भरसभेतून निघून गेल्या, त्यानंतर महापौरांनी सर्वसाधारण सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.
दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. याबाबतची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विदर्भात येत्या २१ जुलैपर्यंत पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. येत्या पाच ते सात दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता नागपूर वेधशाळने वर्तविली आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण त्या अत्यंत हलक्या सरी असणार आहेत, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
ऑपेरशन टायगर यशस्वी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी पुन्हा रवाना झाले आहेत. दिल्ली दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेमुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे.
इराणने युईएच्या व्यापारी जहाजावर हल्ला केला होता, त्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. याबाबत भारताच्या पराष्ट्र मंत्रालयाने इराणचे उपराजदूत मोहम्मद जावद होसैनी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.. पीपीपी तत्वावर जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातील बसस्थानक व महामंडळाच्या जागांचा विकास करण्यास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ आज परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील एसटीची बसस्थानके, आगारे, कार्यालये आणि विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत, "देशात अराजकता पसरवण्याचं काम ठाकरे करत आहेत," असा आरोप केला आहे. विविध राजकीय मुद्द्यांवरून ठाकरे गटावर निशाणा साधताना शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले 9 आरोपी इगतपुरी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पावसाळी पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय
केतन अग्रवाल मृत्यूत न्याय मिळावा यासाठी त्याच्या आईने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. आम्हाला फक्त आमच्या निष्पाप मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी केतनच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित मागणी केली आहे. या पूर्वी केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवत फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता केतनच्या आईने देखील पंतप्रधान यांना पत्र लिहित मागणी केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिले आहे. यासंदर्भात सिंह यांनी पक्षाला पाठवलेल्या नोटिशीवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मागचे मास्टरमाईंड कोणी महाराष्ट्रातील आहेत का? सुनेत्रा वहिनीचे नेतृत्व कुणाला नको आहे? त्या घरभेद्यांना शोधण्याचे आवाहन त्यांनी पक्षाला केले आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी सच्चिदानंद सिंह यांचा उल्लेख श्वान म्हणून केला असून, त्यांना कोण पळतो आहे, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे ते म्हटले आहे.
विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून जालना महापालिकेच्या सभेत भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना नगरसेवकांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळात महापालिकेच्या आयुक्त भर सभेतून निघून गेले. जालना महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौरांनी दहा मिनिटांसाठी तहकूब केली आहे. जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यामुळे शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट माइक फेकल्याने गोंधळात अधिकच भर पडली.
ज्या लाडक्या बहिणींना पगार चालू झाला होता, त्यातील काही लाडक्या बहिणी या नोकरीला होत्या. काहींच्या त्रुट्या निघाल्या, तर काही सरकारी नोकरदार होत्या. त्यामुळे पैसे बंद झाले, ही टीका करणे आता एवढेच काम शरद पवार राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंकडे राहिलेला आहे.
शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधारी महायुती येण्यावरून, एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी यावर सांगणं उचित होणार नाही. कारण शेवटी कोण कोणत्या पक्षांमध्ये जातो, हे आपण सांगू शकत नाही. पण यासंदर्भातली चर्चा मी पण ऐकत आहे, असे म्हटले आहे.
उल्हासनगर येथील बिर्ला गेटसमोर हिट अॅण्ड रनची थरारक घटना घडली आहे. देवेंद्र सिंह राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय सिंह राजपूत हे दुचाकीवरून शहाड स्टेशनच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कार चालकाने काही अंतरावर वाहन थांबवलं. मात्र नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने कार मागे घेत पुन्हा जखमी देवेंद्र सिंह राजपूत यांच्या अंगावरून कार चालवत घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. यात देवेंद्र सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात संशयित एटीएसच्या ताब्यात आहेत.महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता थेट कोकणात उमटत आहे. ATSचे धागेदोरे आता चिपळूणपर्यंत पोहोचले आहेत.
दीड महिन्यापासून मानधन न मिळाल्याने अमरावती महानगरपालिकेतील सफाई कामगार संपावर गेले असून त्यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे अमरावती शहरातील कचरा, नाले साफसफाई आणि घंटा गाड्या सर्व बंद आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसची छापेमारी सुरु केली आहे. दोन्ही शहरात मिळून २३ ठिकाणी पथक चौकशी करीत आहे. राज्यात ६५ ठिकाणी छापेमारी सुरु आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण जी एकत्रित चार्ज शीट दाखल करण्यात आली ती नामंजूर करण्यात यावी, असा अर्ज आरोपी पक्षाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला. तीन गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या चार्ज शीट करावे, असा देखील अर्ज यासोबत करण्यात आला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली जखमी वारकर्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार म्हणून भाजप सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन या वारकऱ्यांना दिला.
नगरसेवकांना फोडणार असल्याच्या चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना आता मातोश्रीवर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बुधवारी (ता. १५) मुंबईत या नगरसेवकांची बैठक होणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरोधात पालिकेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौरा करून ते रात्री मुंबईत परतणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे कारण समोर आलेलं नाही. मात्र, ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दिल्लीला जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.