Maharashtra News Live Update : वांगचुक यांच्या पत्नीची शंका, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची मागणी

Marathi Breaking Live Headlines Updates : सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरुन पोलिसांनी रु्ग्णालयात हलवलं. राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Live Update 2
Live Update 2Sarkarnama

Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नीची शंका, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची मागणी

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने, गितांजली अंगमो यांनी सफदरजंग रूग्णालय अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. परवानगीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतंही इन्ट्राव्हेनस इंजेक्शन देऊ नका अशी मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयातून अन्यत्र हलवण्याची मागणी गितांजली अंगमोंनी केली.

थेट 10 लाखाचा दंड करणार, तुकाराम मुंढे यांच्या पुण्यातून अधिकाऱ्यांना नव्या सूचना..

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता बेकायदेशीर आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता कोणतीही हायगय केली जाणार नाही, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना थेट १० लाख रुपयांचा दंड ठोकणार," असा कडक इशारा त्यांनी पुण्यातून दिला आहे

अभिजीत दिपकेंचे आजपासून अन्नत्याग आंदोलन

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीनं रुग्णालयात नेल्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय... अभिजीत दिपकेंनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय... शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू आहे...

आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक

जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसलेल्या कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. जमावाने त्या महिलेला पकडले. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे राम आहेत; जैन मुनी निलेशचंद्र यांचं विधान

ठाकरे सेनेच्या रामरक्षा आंदोलनावरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी उद्धव ठाकंवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Abhijeet Dipke : अभिषेक दीपके यांच्यावर आंदोलनात शाईफेक, जंतर मंतरवर मोठा गोंधळ

अभिषेक दीपके यांच्यावर आंदोलनात शाईफेक, जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाला आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीनं रुग्णालयात नेल्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. अभिजीत दिपकेंनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय... त्याच दरम्यान दीपकेंवर शाईफेक करण्यात आली आहे.

पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या नावाचा गैरवापर; पुण्यात डॉक्टरवर गुन्हा दाखल

वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे भासवून शासकीय कामे करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या पुण्यातील एका नामांकित डॉक्टरवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिमांशू अजवाणी (वय ४८, रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप येथे सावंतवाडी-रत्नागिरी एसटी बसचा अपघात झाला. मुसळधार पाऊस आणि निसरड्या रस्त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. भरधाव बसने प्रथम रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कलंडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

Ashok Kharat : भोंदू बाबा खरातविरोधात 'ED'कडून तब्बल 3000 पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल

धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव आणून निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तब्बल 3000 पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला असून, तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

US-Iran War Update : इराणचा अमेरिकेवर भयंकर पलटवार; चौफेर हल्ल्यांत ड्रोन डेपो अन् एआय सेंटर उडवले

आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक भयंकर रूप धारण करत चालला आहे. अमेरिकेकडून सलग सातव्या दिवशी बॉम्बहल्ले करण्यात आल्यानंतर इराणनेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच इराणच्या आयआरजीसी आणि इराणी सैन्याने सैनिकी तळांवर केलेल्या चौफेर हल्ल्यांमुळे अमेरिका हादरून गेली आहे. यादरम्यान, इराणने बहरीनमधील अमेरिकेचा ड्रोन डेपो आणि एआय सेंटर उडवल्याचा दावा केला आहे.

Palghar Crime News : 'भारत सरकार' अशी पाटी अन् भाजपचा झेंडा असलेल्या अलिशान कारमधून गुटखा तस्करी

पोलिसांची आणि अन्न व औषध प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी गुटखा तस्करांनी एक अत्यंत धक्कादायक शक्कल लढवल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी थेट कारवर 'भारत सरकार' अशी पाटी आणि भाजपचा झेंडा तसेच कमळ चिन्हाचा वापर केल्याचे उघड झाले आहे. पालघर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला होता. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारी एक संशयास्पद कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या आलिशान कारची झडती घेतली असता, पोलिसही चक्रावून गेले. कारमधून तब्बल 20 लाख 60 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून परदेश दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 19 ते 25 जुलै या कालावधीत परदेश दौऱ्यावर जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. या कालावधीत त्या मोल्दोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया या देशांना भेट देणार आहेत. व्यापार आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमधील संबंध दृढ करणे, हा मुर्मू यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. युरोपशी सहकार्य वाढविण्याचे भारताचे धोरण असून राष्ट्रपतींचा हा दौरा त्या धोरणाला अनुसरूनच आखण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.

TMC And BJP Politics : तृणमूल काँग्रेसच्या तिन्ही बंडखोरांची बिनविरोध निवड

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची साथ सोडत राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा देणारे सुखेंदू शेखर रॉय, सुश्‍मिता देव आणि प्रकाश चीक बराईक हे तिन्ही नेते राज्यसभेवर भाजपच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेच्या रिक्त झालेल्या तीन जागांसाठी केवळ या तीन नेत्यांचेच अर्ज आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या तिन्ही नेत्यांनी दहा दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सोनम वांगचुक यांना उचलले, शरद पवार संतापले, सरकारला इशारा

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून नेले. त्यानंतर शरद पवार यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले, आंदोलकांची मागणी नेमकी कशासाठी होती आणि ती कोणाच्या हिताची होती, हे अगदी स्पष्ट आहे. या बाबत नोटीस देखील देण्यात आल्या होती. तसेच हे आंदोलन दिल्लीत सुरू असताना देखील त्या ठिकाणी साधं कुणी भेटायला किंवा संवाद साधायलाही येत नाही, यावरून त्यांचा उद्दामपणा स्पष्टपणे समोर येत आहे. केंद्र सरकार किती बेजबाबदारपणे आणि चुकीच्या पद्धतीने वागत आहे, हेच यातून सिद्ध होते. हे प्रकरण इथेच थांबणार नसून, उद्या पार्लमेंट सुरू झाल्यावर याच विषयावरून ते गाजणार आहे. असा इशारा शरद पवारांनी दिला.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मंत्री चंद्रकांत पाटील

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पात्र मतदाराने आपले गणना पत्र (एन्युमरेशन फॉर्म) वेळेत भरून संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मंत्री श्री. पाटील यांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत स्वतःचे गणना पत्र भरून ते संबंधित बीएलओकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी नागरिकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

मी आजपासून उपोषण सुरू करत आहे : अभिजीत दीपके

सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवल्यानंतर आता अभिजीत दीपके हे पुन्हा तेथे पोहोचले आहेत. आजपासून मी उपोषण सुरू करत आहे आणि 20 जुलैला मोर्चा काढणार आहे, असे म्हणाले.

Nagpur News: नागपुरात ठाकरेसेना- भाजपात बॅनर वॉर

नागपुरातील राम मंदिराबाहेर बॅनर वॉर पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून रामरक्षा पठणाचे बॅनर लागले आहे. तर दुसरीकडे त्याच परिसरात भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे होर्डिंग लावण्यात आले आहे.

पुण्यासह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट,कॅन्टीनचे परवाने रद्द

पुण्यात FDA ची मोठी कारवाई सुरु आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील १० बेकरी, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.

NEET परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर इथे उपोषणाला बसलेल्या पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस होता. मात्र, आंदोलनस्थळावरुन त्यांना हटवल्याची माहिती मिळतेय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जंतर-मंतरवर दिसतोय. पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईनंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com