

आज भारतीय सनातनी परंपरेत जन्म घेतल्याचा अधिक आनंद
शिवाजी युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासकडे जाऊन आपण खुप युद्ध लढलो आता हे राज्य तुम्हीच सांभाळा. काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही. समर्थ रामदास यांनी राज्य मी चालवणार मात्र आदेश तुमचा असेल असं सांगितलं.
भारत दुर्गा मातेच मंदिर बनल्यावर शक्तीसंपन्न आणि विश्वगुरु बनणार..
भारत मातेचा जयजयकार होतो.. पाकिस्तान किंवा चीन या देशाच्या नावाने जयजयकार नाही
आपल्या देशात महिलांचा सन्मान होतो
भारतातील लोक नागपुरात येऊन भारत मातेच दर्शन करतील.. तेव्हा लोकांना प्रेरणा मिळेल..
इथे सर्व मोठे सूर्य बसलेत..मी लहान दीपक आहे.. जास्त बोललो तर पुढच्या वेळी पत्ता साफ होऊ नये...
मूल चार जन्माला घाला मात्र एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी जन्माला घाला
छत्रपती संभाजी नगरमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपावरून हे आंदोलन उभारण्यात आलं आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शहरातील पैठण गेट परिसरात आंदोलक एकत्र आले होते.
आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार फुटल्यानंतर पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात एका ओळीची पोस्ट करत त्यांनी भाजपने पुन्हा पंजाबी लोकांना धक्का दिल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशकही आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार फुटले आहे. त्यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राघव चड्ढा यांच्यासह फुटीर खासदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या भेटीसाठी भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत.
आम आदमी पक्षाला (AAP) राज्यसभेत मोठा धक्का बसला असून, पक्षाचे ७ खासदार भाजपमध्ये (BJP) सामील झाले आहेत. राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे
काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुवाहाटी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य जनता सहन करणार नाही. कोणाबद्दल काय बोलायचं हे त्यांना समजायला हवं. गायकवाड यांच्याविरोधात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शाहू महाराजांनी केली
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड प्रकरणावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "संजय गायकवाडची जी ऑडिओ क्लीप फिरतेय, त्याची सत्यता माहिती नाही. पण संजय गायकवाडांच्या वक्तव्याशी आणि विचाराशी पक्षाचा संबंध नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत, पक्ष त्याचे समर्थन करत नाही, असं शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षासाठी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तीन टप्प्यात वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभरात फिरुन पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. तर राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्याकडे पक्ष संघटनेची दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर्स आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना नोएडातून अटक केली. एटीएसने त्यांच्याकडून 32 बोरचे एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसं, एक चाकू आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
नागपूर शहरातील नारा घाट परिसरातील पिवळी नदीच्या पुलाखाली एका पोत्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांची हाव आणि एका मुलीच्या अब्रूवर टाकलेली वाईट नजर, एका तरुणाच्या जीवावर बेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी 40 वर्षीय ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याला ताब्यात घेतले आहे.
रिक्षा चालकांना मराठी सक्ती करू नका, या मागणीसाठी 4 मे रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण इथल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देत उप प्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन सादर केले.
बीडच्या आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आष्टी तालुक्यातील जामगाव ते हरिनारायण आष्टा या रस्त्यावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले होते. या शेतापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक कार उभी होती. त्या कारपर्यंत ही आग पोहचली. परंतु त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या कारलाही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्ती कामांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या नियोजित कामांमुळे मंगळवार, 28 एप्रिलला सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत (12 तास) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
जैन समाजासाठी कुठल्याही आरक्षणाची मागणी नसून आम्हाला आर्थिक सक्षमता, शिक्षणाच्या सोई सुविधा मिळाव्या इतकीच आमची माफक अपेक्षा असून मेरीटवरच विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळावी अशी जैन समाजाची भुमिका असल्याचे मत राज्याच्या जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनी व्यक्त केले आहे. ललीत गांधी यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या यंत्रणांचा जैन समाजाच्या अनुशंगाने आढावा घेतला. शहादा तालुक्यातील जैन लेणीचे योग्य पद्धतीने संवर्धन केले जाईल, यासाठी कुठलाही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,अशी ग्वाही गांधी यांनी दिली. जैन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन सर्वंकष पावले उचलत असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक उपक्रम राबविले जात आहेत, असे जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
'शिवाजी कोण होता?' या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत, काल एकनाथ शिंदे पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकालाच अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच अनुषंगाने आज आणि उद्या बुलढाणा वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच उद्या जयस्तंभ चौकात सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमाला हजारो आंबेडकर अनुयायी व शिव प्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन बुलढाणा वंचितचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केलं आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत कर्जत-जामखेड तालुक्यातील 2025 खरीप हंगामाच्या पीक विमा दाव्यांच्या प्रत्यक्ष वाटपास आजपासून सुरुवात झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व अनियमित पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून गतीने सुरु झाली आहे . जामखेड तालुक्यात खरीप 2025 हंगामात उडीद व सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानुसार ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उडीद पिकासाठी सुमारे 6 कोटी 5 लाख 87 हजार रुपये, तर सोयाबीन पिकासाठी सुमारे 11 कोटी 65 लाख 74 हजार रुपये, असा एकूण 17 कोटी 71 लाख 61 हजार 736 रुपयांचा (सुमारे 17.71 कोटी) पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. हा पीकविमा शेतकऱ्यांना आज दिवसभरात वितरित केला असून उर्वरित शेतकऱ्यांनाही गतिमान पद्धतीने पीकविमा वितरीत होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करत असल्याचाही दावा ही त्यांनी केला.
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर आज पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन करत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येत आहे.
भोंदूबाबाअशोक खरातचे आणखी एक कांड समोर आले आहे. खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने संभाव्या 30 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली आहे. या यादीमध्ये प्रशांत परिचारक, राम सातपुते, सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर, राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर,प्रज्ञा सातव, राजा राऊत, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, सुरेश बनकर, अर्चना पाटील चाकूरकर, दयाशंकर तिवारी. अनंतराव देशमुख, गणेश हाके, नीता केळकर, राजेश पांडे, डॉ. आरती फुसाटे, अतुल काळसेकर, माधव भंडारी, माधवी नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.
खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाण्यांचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षित साठा सनियंत्रण समिती तसेच जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक दि. २२ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील खत उत्पादक कंपन्या, बियाणे उत्पादक, वितरक, वाहतूकदार, नोडल एजन्सी आणि संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
"शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या प्रकाशक प्रशांत अंबी यांना आमदारा संजय गायकवाड यांनी फोन करून अश्लील शिवीगाळ केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आंबी यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंबी यांनी अॅड.असीम सरोदे यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.