
भाजपचे विधान परिषदेचे आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना मुस्लिमांचा गरब्यात सहभाग इतका महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी मातोश्रीवरच दांडियाचे आयोजन करून दिनू मोरियाला घेऊन नाचावे, असं वक्तव्य करत डिवचलं आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषण आणि मुंबईमधील आंदोलनावर कठोर शब्दांत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, जरांगे यांना वेळोवेळी आमच्या सरकारचे शिष्टमंडळ भेटायला गेलेले आहे. सरकारचं त्यांचं ऐकून घेत आहे. आम्ही त्यांच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य देखील झाल्या आहेत. प्रत्येकवेळी उपोषणाला बसल्यावर आम्ही त्यांना न्याय देखील दिलेला आहे. परंतु त्यांच्या सनदशीर नसलेल्या मागण्या कशा मान्य करायच्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. (नवी दिल्ली) यांचा सन २०२४-२५ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२४-२५ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची आज शुक्रवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. सर्वाधिक ८ वेळा हा पुरस्कार पटकावणारा 'भीमाशंकर' हा देशातील एकमेव कारखाना ठरला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे थकीत असलेले कांद्याचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी नानासाहेब बाबासो कळसकर, नवनाथ खशाबा थोरात, गोरख गणपत गदादे, गणेश गणपत गदादे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे कांदा विक्रीचे तब्बल 2 कोटी 24 लाख 95 हजार 121 रुपयांचे पेमेंट थकीत आहे. याच गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कृषिभूषण प्रल्हाद वरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडे अडकलेले कांद्याचे पैसे मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एकेरी भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा योगेश कदम यांनी मनोज जरांगे यांना दिल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. धाराशिवहून परंड्याकडे जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. तिने मागवलेल्या एका न्यूट्रिशन प्रोडक्टमध्ये चक्क छोट्या अळ्या आढळल्याचा दावा केला आहे. बिपाशाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला. तसेच तिने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनाही टॅग केले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. एसईबीसी आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत असून, न्यायालयीन स्थगिती येऊ नये यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, आवश्यक त्या मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणावरून कार्यकर्ते आक्रमक झाले. अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा न दिल्यास पुढचा नंबर अध्यक्षांचा असेल, असा इशारा देण्यात आला. या प्रकरणी 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अजय बारस्कर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तक्रार देण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. जरांगेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सरकारने जातनिहाय जनगणनेचं आश्वासन पाळलं नाही. आता ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा कट केला जात असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. ओबीसींची सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आज पुन्हा इशारा दिला. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असा सांगत त्यांनी मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. उद्या दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली. परराज्यातून आणलेला संशयित खवा आणि पनीरचे 2 ते 4 कंटेनर जप्त करण्यात आले. पथकाने पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. नांदेड-हैदराबाद महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल तासाभरापासून महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचाग आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे.अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली जात असून जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे.
धुळे: सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मराठ्यांनी मागील दोन तासांपासून रोखला आहे. पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूस वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोज जरांगेंचं उपोषण लवकरात लवकर थांबवा, अन्यथा महाराष्ट्रात गदारोळ घालण्याचा मराठा बांधवांनी इशारा दिला आहे.
पुणेः बुधवार पेठ परिसरात एफडीएची मोठी कारवाई केली आहे. संशयित खवा आणि पनीरच्या दोन ते चार कंटेनरमधील सॅम्पल गोळा करण्यात येत आहे. परराज्यातून हे कंटेनर आल्याचा संशय आहे. पुण्यात खवा आणि पनीरचे मोठ्या प्रमाणातील वितरण या ठिकाणाहून होते. तपासणीनंतर कारवाईची दिशा ठरणार आहे.
बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता विविध आर्थिक व्यवहार करून संस्थेचे तब्बल 34 कोटी 77 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सोसायटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे यांच्यासह इतरांविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोसायटीचे लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल यांनी फिर्याद दिली आहे.
मंत्र-तंत्र, पूजाविधीद्वारे 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत मुंबई महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्याला सुमारे 12 लाख रुपयांना गंडविणाऱ्या भोंदू बाबाला अभोणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिराचंद शिवाजी बर्डे, (रा. पिंपळे खुर्द ता. कळवण जि. नाशिक) असे भोंदूबाबाचे नाव असून पोलिसांनी त्याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील चार संशयित आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून अन्य तिघे साथीदार फरार आहेत.
पळासखेडे (ता.पारोळा) आणि भुसावळ अशा दोन ठिकाणी दोन जणांचे खून झाले. पळासखेडे येथील युवकाचा खून पूर्ववैमनस्यावरून झाला, तर भुसावळात खून झालेला इसम हा रेल्वे कर्मचारी होता. मयूर दुर्वास पाटील ( पळासखेडे, ता. पारोळा) आणि तुषार गोविंदा सोनवणे ( रा. समता नगर, भुसावळ) असे खून झालेल्यांची नावे आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची तयारी? जालना ते मुंबई जाण्यासाठी जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे. दुसऱ्या बाजूला सकल मराठा समाजाच्यावतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली जात असून जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली असून जत तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी जत तालुक्यातील संख येथे विठ्ठलाला साकडे घालण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महाआरती करत राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जत तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, असे साकडे घालण्यात आले.
चीनच्या आग्नेय भागातील जिआंग्शी प्रांतात गेल्या आठवड्याच्या अखेरीस मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. यात अनेकजण मृत्युमुखी पडले असून आणखी एक मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या 20 हून अधिक झाली आहे, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिली. चीनच्या पूर्व किनाऱ्यावर सौडेल चक्रीवादळ धडकल्यानंतर. सुइचुआन काउंटी परिसरात अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत होता.
ब्राझीलमधील इंधनाचे दर कमी करण्याच्या उद्देशाने अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी अध्यादेश आणि तात्पुरता कायदा जारी केला. अध्यक्षीय निवडणुकीला काही आठवडे शिल्लक असताना आणि अमेरिका-इराण युद्धामुळे इंधनाचा खर्च वाढत असताना हे निर्णय घेण्यात आले. या बेजबाबदार युद्धाचा फटका आम्ही तुमच्या खिशाला बसू देणार नाही, असे लुला यांनी यावेळी सांगितले.
युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेत त्यांच्या कल्पना, नेतृत्वगुण आणि नवकल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा युवा अधिकारी अभिलाष म्हस्के यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या उपक्रमात 15 ते 29वयोगटातील युवकांना सहभागी होता होईल.
आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून धरणे आंदोलन करणारे युवक 28 सप्टेंबरला नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणार आहेत. राज्यातील पाच हजार आदिवासी या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज असून पाच ऑक्टोबरच्या दरम्यान हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.