Maharashtra Political Live Update : ‘दुष्काळसदृश्य’मधून बुलढाण्याला वगळताच रविकांत तुपकर प्रचंड आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसण्याचा दिला सल्ला

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये तयारी सुरू, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल,
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

उमरखेडच्या चिमुकल्यांची गणपतीच्या वर्गणीसाठी आमदार बांगर यांना हाक

गणपती बाप्पाच्या आगमनाला काही तास अवघा शिल्लक असताना सर्वत्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अशात यवतमाळच्या उमरखेड येथील चिमुकल्या करण राणे याने गणपतीच्या वर्गणीसाठी थेट शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरकडे वर्गणीची मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या निरागस बोलण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात या चिमुकल्याची आगळीवेगळी वर्गणीची मागणी चर्चेचा विषय ठरली आहे.

जरांगेंना नाशिकरांचाही पाठिंबा, मराठा बांधव साहित्य घेऊन निघणार

मनोज जरांगे यांनी मुबंईमध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय झाले आहे. अंतरवली सराठी येथून परतल्यानंतर नाशिकच्या लासलगाव येथे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक होऊन पुढील रणनीती ठरवण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते रेल्वे तसेच गाड्यांमधून निघणार असून जाताना मराठा बांधवांसाठी शिधा तसेच जेवणाचे साहित्य घेऊन निघण्याचे या बैठकीत ठरले आहे.

कल्याणमधील नामांकित हॉटेलमधील हाय-प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई; आयोजकांवर गुन्हा दाखल

कल्याणमधील नामांकित के.डी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित हाय-प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परवानगीविना सुरू असलेल्या या पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी सुमारे ६५ तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं. ड्रग्स पुरवठ्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, छाप्यात कोणतेही अमली पदार्थ आढळून आले नाहीत. या प्रकरणी ७ आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

लक्ष्मण हाके यांना दिलेली वाय प्लस सुरक्षा तात्काळ काढा, अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा अल्टिमेटम

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्र सरकारने दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. 15 दिवसांच्या आत सुरक्षा न काढल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा ही डोंगरे यांनी दिला आहे.

चार चाकी वाहनावर आमदार असा लोगो लावणाऱ्यांवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात सध्या मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहनावर ब्लॅक फिल्डिंग लावून त्यावर आमदाराचे लोगो लावलेल्या गाड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आमदारांच्या गाड्या नसताना देखील काही खाजगी वाहन चालक स्वतःला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी म्हणून आपल्या आलिशान कारला ब्लॅक फिल्डिंग लावून त्यावर आमदाराचा लोगो लावून शहरात वावरत आहेत. अशा वाहनांवर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आता गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच हे लोगो कुठे तयार करण्यात येतात याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

‘दुष्काळसदृश्य’मधून बुलडाण्याला वगळताच रविकांत तुपकर प्रचंड आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसण्याचा दिला सल्ला

दुष्काळसदृश्य यादीतून बुलडाणा जिल्ह्याला वगळण्यात आल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर प्रचंड आक्रमक झाले आहेत. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एकत्र बसून बुलाडाण्याचा समावेश दुष्काळी यादीत केला पाहिजे आणि हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळवून घेतली पाहिजे, अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची भावना आहे, असेही तुपकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनो घाबरून जाऊ नका : सर्वांना सरसकट हेक्टरी मदत मिळेल : सुरेश धस

शेतकरी राजाला माझी विनंती आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. पोट भरायला इकडे पळ तिकडे पळ असे करू नका. सर्वांना सरसकट हेक्टरी मदत मिळेल, असेही आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

देशातील 21 राज्यांमध्ये 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू होईल : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या २०२९ पर्यंत देशातील २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे शाह यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत बैठक सुरू आहे. बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. यातून कोणता निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमित शाह अन्‌ एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा

मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर शाह आणि एकनाथ शिंदे हे एकाच गाडीतून एशियाटिक सोसायटीच्या कार्यक्रमाला गेले, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Pm Modi : पीएम मोदींच्या वाढदिवसापासून अभियान राबवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 वर्ष काम केले आहे. मोदींच्या काळात भारताने प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित केेले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. येत्या 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या एका महिन्याच्या काळात हे अभियान राबवले जाईल. देशभरात हे अभियान राबवणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

Manoj Jarnge : आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक

आझाद मैदान पोलिसानी गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देत परवानगी नाकारली आहे. गेल्या आंदोलनाचा दाखला देत आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले. परवानगी नाकारल्यानंतर आता मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही संविधानाप्रमाणे चालतो. सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधील नाही. सरकारचे नियम आम्ही मानत नाही. द्वेष भावनेने परवानगी नाकारली आहे. गेल्यावर्षी देखील गणेशोत्सव होता. तरीही आम्ही शांततेत आंदोलन केलं. मिरवणूक गणेशोत्सवाची देखील होईल, ठरल्याप्रमाणे आम्ही उपोषण करू. आमचे वकील आजपासून कामाला लागतील, असेही पुढे जरांगेंनी म्हटले आहे.

Radhakrishna Vikhepatil : जरांगेंनी आंदोलन थांबवावं, विखे पाटलांचे आवाहन

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवावं, अशी भूमिका मांडली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर अनेक निर्णय घेतले असून, त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

Manoj Jarange : मुबंईत आल्यावर मला मारण्याचा डाव : मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केला आहे. “मुंबईत आल्यावर मला मारण्याचा डाव” असल्याचा दावा जरांगेंनी केला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, मुंबईतील मराठा आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचंही समोर आलं आहे.

Maratha Protest : मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली

मराठा आंदोलनासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगेंनी आझाद मैदानात आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती, मात्र कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली असून, यामुळे आता आंदोलनकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलंय.

Pune News : पुण्यात शिवापूर टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा कहर! प्रवासी त्रस्त

पुण्यातील शिवापूर टोलनाक्यापासून कोकण, कोल्हापूर आणि सातारा मार्गावर 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत... वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होतायत... प्रशासनाने तातडीने एक दिवस टोलमुक्ती जाहीर करावी अशी मागणी नागरिक करतायत...

Sanjay Raut सरकारमधील गुंडांसाठी कोणती भाषा वापरायची? संजय राऊत यांचा सवाल 

मराठा मोर्चावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये.. जरांगे पाटलांच्या भाषेवर आक्षेप घेऊन सरकार चर्चा टाळत आहे, मात्र सुसंस्कृत भाषा वापरणाऱ्या विद्यानंद बापटांच्याही मागण्या मान्य झालेल्या आहे का?...असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय... सरकारमधील गुंडांना नेमकी भाषा कोणती वापरायची...असं बोलत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

मनोज जरांगे यांचे मुंबई पोलिसांना पत्र

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवत उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप मुंंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही.

Pravin Darekar news : मुंबई पोलिसांवर आधीच ताण

गणेशोत्सवामुळे पोलिसांवर आधीच ताण आहे. आंदोलनामुळे ताण वाढू नये, अशी अपेक्षा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यावर ठाम आहेत.

Amit Shah news : आम्ही इतिहास पुसत नाही, सत्य समोर आणतोय

आम्ही इतिहास पुसत नाही, सत्य समोर आणतोय, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एशियाटिक सोसायटीच्या कार्यक्रमात केले. सोसायटीमध्ये मोठी ग्रंथसंपदा आहे. हे ज्ञान आता देशभरात पोहोचवावे, अशी अपेक्षाही शहांनी व्यक्त केली.

Manoj Jarange news : मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे ठाम

मुंबईला जाण्यावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी आज स्पष्ट केले. आपण १९ सप्टेंबरला आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे. सरकारकडे अजून वेळ आहे. आम्ही परवानगी मागितली आहे. सरकार परवानगी देईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

Shrirampur : मतमाऊलीच्या दर्शनासाठी सहा लाख भाविकांचा सागर; हरेगावला ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून अधिकृत मान्यता

श्रीरामपूर तालुक्यातील ऐतिहासिक संत तेरेसा चर्च (हरेगाव मतमाऊली भक्तीस्थान) येथील 78 वा मतमाऊली यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या सहा लाखांहून अधिक भाविकांनी मतमाऊलीचे दर्शन घेत नवस फेडले. यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. दरम्यान, नाशिक धर्मप्रांताचे महागुरूस्वामी बार्थोल बरेटो यांनी हरेगावला अधिकृत ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित केले. त्याबाबतचे घोषणापत्र त्यांनी स्थानिक धर्मगुरूंकडे सुपूर्द केले.

Mahayuti Government : राज्यातील जिल्हा परिषद CEOची महाबळेश्वरात कार्यशाळा; 'उमेद मॉल'बाबत मंत्री गोरेंनी व्यक्त केली नाराजी

राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महाबळेश्वर येथे दोन दिवसांची कार्यशाळा पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात 15 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवून त्यावर आणखी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण विकासाच्या विविध योजनांचा आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे आणि पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी उमेद मॉल या संकल्पनेसाठी राज्य सरकार कडून निधी उपलब्ध असून देखील एकही उमेद मॉल तयार न झाल्याने नाराजी व्यक्त केली.

Beed Crime : परळी पोलिस ठाण्याच्या दारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

परळी पोलिस ठाण्याच्या दारातच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही वाद झाल्याने दोन्ही गट परळी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र वाद वाढल्याने पोलिस ठाण्याच्या अगदी दारातच दोन गट भिडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. व्हायरल व्हिडिओतील व्यक्तींवर पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latur Rain : लातूरमध्ये पावसासाठी सामूहिक नमाज

पावसाने दडी मारल्याने लातूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसासाठी लातूरमध्ये मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करून सामूहिक दुआ करण्यात आली. पाऊस पडावा, शेती-पिकांना दिलासा मिळावा आणि नागरिकांवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे, यासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्यात आली. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले.

Nanded Maratha Andolan : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनासाठी नांदेडमध्ये जोरदार तयारी

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर राज्यातून मराठा एकटवायला सुरूवात झाली आहे. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर नांदेडमधून मराठा बांधवांनी मुंबईकडे जाण्याची तयारी केली सुरू केली आहे. नांदेडच्या माहूर येथील मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी सज्ज होत असतानाच, जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांना समर्थन दिले आहे.

Palghar Eknath Shinde Shiv Sena : डाॅक्टर मारहाण प्रकरण; जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेच्या सात कार्यकर्त्यांना अटक

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणातील पसार आठ पैकी सात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे . यामध्ये जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे . तर एक आरोपी अजूनही पसार असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून घेतला जात आहे. रिलीफ हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात 22 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी 14 जणांना अटक करण्यात आली असून आठ जण फरार होते, तर काही वेळापूर्वी पालघर पोलिसांनी आणखीन सात जणांना अटक केली आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्या -अंबादास दानवे

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संवाद साधावा, अशी देखील ते म्हणाले.

आशाताई बुचके यांचे निधन

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांचे निधन झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना जुन्नर तालुक्यात आपला स्वतंत्र राजकीय ठसा उमटवला होता. ग्रामीण भागातील प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर त्या आक्रमकपणे भूमिका मांडत असत. त्यांच्या लढाऊ आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्या जुन्नरच्या राजकारणात विशेष चर्चेत राहिल्या.

रात्री उशीरा अंबडच्या डीवायएसपींनी घेतली मनोज जरांगेंची भेट

मुंबईकडे कूच करण्यासाठी निघणाच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची अंबडचेडीवायएसपी सिद्धेश्वर धुमाळ यांनी रात्री उशिरा मनोज जरांगेंची भेट घेतली. उपोषणस्थळी त्यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com