

नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींना काजू आणि बादाम देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर मंत्री पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारताना कोणत्याही बैठकीची एक व्यवस्था असते. बैठकीत चहापाणी, काजू, बादाम दिले जातात. आम्हीच काय तिथे कोणीच काही काजू, बदाम खाण्यासाठी जात नाही. मूळात काजू, बदाम हा काही महत्त्वाचा विषय नाही. बैठक शेतकऱ्यांसाठी होती. तो विषय महत्त्वाचा आहे, विरोधकांनी याचं राजकारण करु नये असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
नागपूरमधील इंदोरा-दिघोरी या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचं अखेर लोकार्पण झालं आहे. या उड्डाणपुलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या धर्तीवर हा नामकरणाचा निर्णय घेण्यात आला.नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा शनिवारी पार पडला.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाचा निर्णय घ्या. शेवटपर्यंत वाट पाहू नका, असे सांगण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत कर्जमाफीची तिसरी यादी येईल. त्यात सर्वांची नावे असतील, असे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एनएसयुआयचा पराभव करत बाजी मारली आहे. अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिवपदावर अभविपीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
दिशा सालियान हिचे वडिल सतीश सालियान यांनी आज मातोश्रीवर जाऊन ५०० कोटींची मानहानीची नोटिस दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलाच्या टीमने सतीश सालियान यांची नोटिस स्वीकारली आहे. सतीश सालियान यांच्या वकिलाने ही नोटीस दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही रजिस्टर पोस्टाने नोटिस पाठविण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये शनिवारी झालेल्या कुंभमेळ्याच्या बैठकीदरम्यान राडा झाला. त्र्यंबकेश्वरचे साधू महंत बैठक सुरू होताच आक्रमक झाले. त्र्यंबक राजाच्या प्रतिकृतीवरून साधू महंत भडकले. बैठकीत ठेवलेल्या त्र्यंबक राज्याच्या मुखवट्यावरून साधू महंत संतप्त झाल्याचे पाहावयास मिळाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच गोंधळ घातला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्जमाफीची तिसरी यादी पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्याची तारीख समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 विषयीची आनंदवार्ता समोर आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आता तिसऱ्या यादीची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. तिसऱ्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होऊन खाते निरंक होतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील जवळपास 5 लाख शेतकर्यांना 4 हजार कोटींची कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवा दरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे आव्हान पोलिसांनी केले होते. मात्र या आव्हानाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करण्यात आल्याचे सांगलीत समोर आले आहे. यामुळे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आरगमध्ये नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर पोलिसांनी कारवाई केली. तसेच 9 डीजे जप्त करण्यात आले आहेत.
नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामाच्या प्लेट्स दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांसह सत्ताधारी टीका करताना दिसत आहेत. अशातच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उडवाउडवीचे उत्तरे समोर आली असून यावर संताप व्यक्त होत आहे. भरणे यांना नांदेड येथे याबाबत प्रश्न केला असता त्यांनी, आमच्या समोर तर काजू-बदाम आले नाहीत. आम्ही तर बघितले सुद्धा नाहीत. जर कोणी एखाद्याने खाले असेल तर ते शुगर पेशंट असतील. कारण मिटिंग साधारणता चार तास चालली. ती 76 तालुक्याची बैठक होती. चार तास मी एका खुर्चीवरून हललो नाही. एखादा आमदार, खासदार शुगरचा पेशंट असला तर त्यांनी खाल्ली असतील. आमच्याकडं तर काही आलं नाही. विरोधकांनी असले आरोप करू नयेत, एखाद्याच्या आरोग्याशी आपण खेळू नये असे त्यांनी उत्तर दिले आहे.
नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदामाच्या प्लेट्स दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. तर ड्राय फ्रूटवर ताव मारत असल्याचा खासदार बंडू जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून मंत्र्यांवर टीकेची झोड उठली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, साधारणपणे आपल्याकडे अशी पद्धत आहे की, शासकीय बैठकींमध्ये प्रशासन किंवा स्थानिक अधिकारी तिथे काही खाण्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे आणून ठेवतात. दुष्काळाच्या परिस्थितीत हे असं का करत आहेत, असा भाग नाही; पण प्रशासनाने संवेदनशीलपणे वागण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.
यावेळी अलनिनोमुळे दुष्काळीची स्थिती निर्माण झाली आहे. हे संकट येईल, हे माहीत असल्यामुळे सरकारने आधीच उपाययोजना केली होती. वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला होता. मोठ्या प्रमाणात चारा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना त्याचा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिकाचा उतारा, उत्पन्न कमी होण्याची परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पालकमंत्र्यांची बैठक आपण घेतली होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अंदाज घेण्याचे आदेश दिले होते. पुढच्या आठवडाभरात या परिस्थितीचा सरकारच्या वतीने आढावा घेतला जाईल.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर आरबीआय कडून बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. मागच्या दहा वर्षापासून बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने बडतर्फेची कारवाई केली आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. प्रकृती खालवल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. हुबळीतून ते तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. त्यांचा कर्नाटकातील निपाणी येथे एकसंबा येथे कार्यक्रम होणार होता. तर रविवारी कोल्हापूरात आमदार प्रकाश आवाडे यांच्या कारखान्यातील ग्रीन प्रोजेक्टचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते.
नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत नेत्यांना काजू-बदाम खायला दिल्याचा व्हिडीओ समोर आल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
एखादी बैठक असेल तर साधारणपणे प्रशासनाकडून काजू, बादाम दिले जातात. आपल्याकडे तशी पद्धत आहे. पण प्रशासनाने काही ठिकाणी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोणीही या गोष्टी जाणीवपूर्वक करत नाहीत. दुष्काळ म्हणून कोणी असं करत नाही. पण तरीही प्रशासनाने अशा गोष्टी टाळल्या पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
मुंबईतल्या IIT पवईत बी.टेक.च्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. परीक्षा सुरू असताना कॉपी करताना पकडला गेल्याचा आरोप त्याच्यावर आहे...यामुळे त्याला कारवाईची भीती दाखवण्यात आली होती. यातूनच त्याने हॉस्टेलमध्ये जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय...या घटनेच्या निषेधार्थ संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकत्र येत IIT प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय... 22 सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे... नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर सह मुंबई महानगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय...
नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खासदार संजय जाधव काजू-बदाम खाताना दिसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच खासदार बंडू जाधवांनी काजू-बदामवर ताव मारल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेतील बहुचर्चित सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष महासभा आयोजित केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. महापालिका सचिव डॉ. दिपाली चौगले यांनी १७ सप्टेंबर रोजी काढलेल्या नोटिसीनुसार, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ही प्रक्रिया २५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे प्रशासनाला बंधनकारक आहे.
दुधातील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई झाल्यानंतर बाजारातील दुधाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला. दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने दरात सुमारे 10 रुपयांची वाढ झाली असून, वाढलेल्या दरामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
काँग्रेसकडून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा नांदेडमध्ये अडवण्याचा प्रकार झाला. कृषी मंत्री यांच्या वाहनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही चुलीवरच विद्यार्थ्यांचे जेवण शिजत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या एटापल्ली आणि भामरागड दौऱ्यात हे वास्तव उघड झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव, मिरवणुका व इतर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. काल मलकापूर शहरातील कर्णकर्कश व मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवणाऱ्या भुसावळ येथील डीजे मालक आशिष रवींद्र अडकमोल याच्या विरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करत कलम 136 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे जिल्ह्यातील डीजे मालक व चालकांमध्ये खळबळ उडाली आहे अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यानंतर झालेल्या पावसानेही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत न अडकवता सरसकट भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने (महाराष्ट्र) केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.
‘पेन्शन कार्ड’ बनवून देण्याचे आमिष दाखवित, ‘एपीके’ फाईल पाठवून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याची पाच लाख 49 हजार रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केली.याप्रकरणी अजनी पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे 60 वर्षीय तक्रारदार कर्मचारी राज्यशासनाच्या पाटबंधारे विभागातून जुलै 2024 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर अन् येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळा 2027 च्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (ता. 19) दुपारी चार वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या समिती सभागृहात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्याची ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यानुसार मुंबई वगळता ‘एमएमआर’ क्षेत्रातील अंबरनाथ, कल्याण परिसरात 1400 घरे उभारली जाणार आहेत. त्यापैकी सुमारे 950 घरांचे काम सुरू असून, उर्वरित 450 घरे वेगवेगळ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तीन वर्षांत सर्व घरांचे काम पूर्ण केले जाईल.
प्रशासकीय व्हॉट्सॲप समूहांचा वाढता वापर आणि शिक्षकांवर पडणारा अशैक्षणिक कामांचा ताण याविरोधात राज्य प्राथमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहाला जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय प्रशासकीय व्हॉट्सॲप समुहांतून बहुतांश शिक्षक एकाच वेळी बाहेर पडले.
सणासुदीत वांद्रे टर्मिनसवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणामार्फत 3700 प्रवाशांना सामावून घेणारे नवे ‘होल्डिंग एरिया’ उभारण्यात येत आहे. 16.43 कोटी खर्चाच्या या सुविधा केंद्राचे काम सुरू असून, दिवाळीपूर्वी ते प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. एकूण 2625 चौरस मीटर क्षेत्रात हे केंद्र उभारले जात आहे.
दुष्काळामुळे राज्यातील खरीप हंगाम हातचा गेल्याने बळिराजा हवालदिल झाला असून भरपाईबाबत मात्र सरकारी पातळीवर अद्याप फारशा वेगाने हालचाली होत असल्याचे दिसून येत नाही. या भरपाईसाठी ‘पावसाची तूट’ आणि ‘प्रदीर्घ खंड’या दोन निकषांचा विचार केला जातो पण आता प्रशासनाने त्याची पडताळणी सुरू केली आ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.