Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्रासह देशभरातली आज 18 फेब्रुवारीच्या सर्व राजकीय, प्रशासकीय घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Politics
Maharashtra Politicssarkarnama
Published on
Updated on

संभाजीनगरातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यात आज सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्यानं रबी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयगाव, जरंडी, बहुलखेडा, निंबायती, फरदापूर, सिल्लोड, उपळी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे.

नाशिकच्या  सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह अनेक ठिकाणी गारपीट

- सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट

- दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तारांबळ

- अवकाळी आणि गारपिटीचा कांदा, गहू आणि अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी हवालदिल

धमकी देणारा ईमेल मिळाल्याने एकच खळबळ

पुण्यात बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. दुपारी 2.13 वाजता आलेल्या मेलमध्ये सायनाईड गॅसयुक्त बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला होता. तातडीने पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तपास केला असता कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. हा मेल अफवा पसरवण्यासाठी पाठवण्यात आल्याचे समोर आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Aasawari Jagdale : पुणे महानगरपालिकेत 'प्रशासकीय अधिकारी

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील रहिवासी संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारने आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिकेत नोकरी सरकराने दिली आहे. फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत शहीद संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत 'प्रशासकीय अधिकारी' (वर्ग-२) म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल - विजय वडेट्टीवार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नसल्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळेंनी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या या भूमिकेला काँग्रेसने विरोध केला आहे. शिवाय बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक

महसूल खात्यात सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली. महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी एक ते दीड लाख शेतकऱ्यांना फसवल्याची कबुली त्यांनी दिली. तर सभागृह संपायच्या आत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिलं.

अशोक खरातला  सहा दिवसांची पोलीस कोठडी

नाशिकमधील अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवारी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं, यावेळी न्यायलयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संजयकाकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं होतं - जयंत पाटील

सांगली जिल्हा परिषदेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी या विजयामागे संजयकाका पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचं वक्तव्य केलं आहे. संजयकाकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं होतं. तिकडच्या हालचाली त्यांनीच आम्हाला सांगितल्या, असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

कॅप्टन खरात यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही - रुपाली चाकणकर

नाशिक पोलिसांनी 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्या प्रकरणी अशोक खरातला अटक केली आहे. तर या खरातसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल होत आहेत. या प्रकरणावर आता चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक्सवर म्हटलं की, 'शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील,पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे.'

Maha Vidhan Sabha 2026 : मालाड भूखंड घोटाळ्याची आता अतिरिक्त मुख्य सचिवांकडून चौकशी! नगरविकास राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबईतील मालाड पूर्व भागात प्रकल्पग्रस्तांसाठीच्या भूखंड निविदेत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अस्लम शेख यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधीवर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले असून, तोपर्यंत महापालिकेला पुढील कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Plastic FlowerBan2026 : प्लास्टिकच्या फुलांच्या वापर करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई होणार

प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मोठी घोषणा केली असून, आता अशा फुलांचा वापर करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी विशेष अधिसूचना काढली जाणार आहे.

सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम', जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा

सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील या जिल्हा परिषेदच्या अध्यक्षा म्हणून निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तर आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांची रणनिती यशस्वी ठरली असून जयंत पाटलांनी सांगून भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' केल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना २४ मते मिळाली असून आघाडीच्या संगीता पाटील यांना ३४ मते मिळाली आहे.

धमकी दिल्याप्रकरणी भाजप आमदाराविरुद्ध चौकशीचे आदेश

नांदेड येथील भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या चौकशीचे आदेश न्यायलयाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पवार यांनी 70 % अपंग असलेले चुलत भाऊ श्रीराम पवार यांना शेताबाबत दाखल असलेला दावा मागे घेण्यासाठी धमकी दिली होती. जून 2023 मध्ये त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि सात आठ जणांनी श्रीराम पवार यांच्या शेतात जाऊन ही धमकी दिली होती. तर यानंतर श्रीराम पवार यांनी आपल्या तक्रारीत त्यांना आमदारासह त्यांची पत्नी आणि सात आठ जणांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले होते. तर तक्रारीनंतर आता नायगाव न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा इशारा, काळाबाजार करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई

आखाती देशांतील युद्धामुळे घरगुती आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत घरगुती गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिला आहे. तसेच, अशा प्रकारांमध्ये आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर पावले उचलली जातील, वेळप्रसंगी मकोका लावण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजप-राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा घात

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपा-राष्ट्रवादीने हातमिळवणी करत ऐनवेळी शिवसेनेचा घात केला. दोन दिवसापुर्वी परभणी जिल्हा परिषदेत महायुतीने एकत्र काम करण्याचा निर्णय झाल्याचे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मुंबईतून जाहीर केले होते. अध्यक्षपद भाजपाला, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा तर शिवसेनेला महत्त्वाचे सभापती पद असा फाॅर्म्युला ठरला. पण काही तासातच हे चित्र बदलले आणि भाजपा-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेलाच सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी केली.

पाणी प्रश्नावरून सांगली महापालिकेच्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष नगरसेवकांत जोरदार वादावादी

पाणी प्रश्नावरून सांगली महापालिकेच्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष नगरसेवकांत जोरदार वादावादी झाली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक राजेश नाईक आणि माजी महापौर मैनूदिन बागवान यांच्यात जोरदार वादावादी झाली. वाद इतका विकोपाला गेला कि हे दोघेही नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले मात्र आजूबाजूच्या नगरसेवकांनी या दोघांनाही रोखले.

Abdul Sattar : अब्दुल सत्तार भाजपवर भडकले

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले आहे. भाजपने शिवसेनेलाच बाजूला काढल्याने सत्तार यांनी आपला केसाने गळा कापला, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आज कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केला.

Assembly update : अध्यक्षांनी टोचले आमदार फरांदेंचे कान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव विधानसभेत बोलत असताना त्यांच्या भाषणादरम्यान भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी अडथळा आणला. त्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांना खडसावले.

Sangli ZP Election : सांगलीत एकनाथ शिंदेंच्या सेनेची माघार

सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची माघार. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी डॉ. शितल बाबर यांचा, तर उपाध्यक्ष पदासाठी हिम्मत जाधव यांनी अर्ज केला होता दाखल.

भाजपाकडुन अध्यक्ष पदाच्या स्वप्नाली मासाळ उमेदवार, तर उपाध्यक्ष पदाचे कामेरी गटाचे जयराज पाटील उमेदवार. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील अध्यक्षपदाच्या उमेदवार तर उपाध्यक्ष पदाचे काँग्रेसच्या ऋषिकेश पाटील उमेदवार.

Sushma Andhare : भोंदूबाबाचे केसरकर, तटकरे, चाकणकर भक्त...

कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. खरात याच्यावर बलात्कार, यौन शोषण यासारखे आरोप आहेत. यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली आहे.

सांगली ब्रेकिंग : सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अर्ज भरण्याची प्रकिया पूर्ण

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांनी अध्यक्षपदाचा अर्ज केला दाखल; तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या ऋषिकेश पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

भाजपाकडुन अध्यक्ष पदासाठी स्वप्नाली मासाळ यांनी दाखल केला अर्ज,

तर उपाध्यक्ष पदासाठी कामेरी गटाचे जयराज पाटील यांनी दाखल केला अर्ज

तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी डॉ. शितल बाबर यांचा, तर उपाध्यक्ष पदासाठी हिम्मत जाधव यांचा अर्ज दाखल

1 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची आहे मुदत, यातील कोण अर्ज माघारी घेणार याकडे लक्ष

सांगली ब्रेकिंग; सांगलीत अध्यक्ष निवडीत मोठ्या घडामोडी

सांगलीत अध्यक्ष निवडीत मोठ्या घडामोडी

भाजप अध्यक्ष पदासाठी दावा केला असताना शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नागेवाडी जिल्हा परिषद सदस्य शीतल बाबर या अध्यक्ष पदासाठी

तर भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी जयराज पाटील.

संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्वराज्याचे रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वढू येथे समाधीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. तुळापूर येथील बलिदानस्थळीही त्यांनी अभिवादन केले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून आदर व्यक्त केला आणि स्मरण केले.

सांगली ब्रेकिंग : महाविकास आघाडीकडून कासेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी

महाविकास आघाडीकडून कासेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे कुंडल जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड यांना उमेदवारी. सांगली जिल्हा परिषदेत अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य येण्यास सुरुवात झाली आहे. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गटाचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सदस्य अभिजीत पाटील जिल्हा परिषदेत अर्ज घेण्यासाठी दाखल. दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा पार पडणार आहे.

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; 21जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्वीकृत नगरसेकांची आज निवड

पुणे महापालिकेच्या आज सभेत स्वीकृत नगरसेकाची निवड केली जाणार आहे. 10 नगरसवेक निवडले जाणार आहेत. मात्र. दोन जणांचे कागपत्र अपूर्ण असल्याने त्यांचे अर्ज बाद झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने यावर अधिकृत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे महासभेतच वास्तव समोर येणार आहे.

अॅसिड हल्ल्या प्रकरणी वडगावपानचे गावकरी आक्रमक, रास्ता रोको

अहिल्यानंगर जिल्ह्यातील संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याविरोधात वडगावपान गावचे गावकरी आक्रमक झालेत. त्यांनी आज रास्तारोको आंदोलनाची हाक दिलीय. आरोपीला पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी गावकऱ्यांनी दिली आहे.

'म्हाडा'च्या सदनिकांमध्ये १५४ कोटींचा घोटाळा, भाजप नेता रडारवर

नाशिक महापालिका हद्दीत म्हाडाच्या वीस टक्के सदनिका शासनाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र 49 प्रकल्पांमध्ये यात मोठा घोटाळा झाला आहे. 154 कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजप सह अन्य राजकीय पक्षांचे काही नेते गुंतले असल्याचे पुढे आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. दरम्यान, भाजपने मुळशी तालुक्यातून माण हिंजवडी गटातून विजयी झालेले जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com