

शिरूर तालुक्यात नवरा बायकोने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक बाब समोर आलं आहे.ही घटना सविंदणे येथे रात्री उशिरा घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त सैनिकासह तिघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून मूळ गावी आलेल्या राजेश सावळेराम लंघे व स्वाती राजेश लंघे हे मुंबईहून मूळ गावी आले होते. त्यावेळी सेवानिवृत्त सैनिक विजय ज्योतिबा कसेकर यांच्याकडील परवानाधारक पिस्तुलाद्वारे हवेत गोळीबार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेची तिसऱ्यांदा शपथ घेतली. ते म्हणाले, आमच्याकडून विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यावर ही चर्चा थांबली. आता त्या विषयाची आमच्या पक्षात चर्चा झाली नाही. अजितदादांसोबत या संदर्भात पाच- सहा बैठका झाल्या. बैठक झाल्यावर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करायचे. भविष्यात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते की नाही आज ते सांगता येत नसल्याचंही पवारांनी यावेळी नमूद केलं.
लातूर महापालिकेत काँग्रेस-वंचित आघाडीची सत्ता आहे. आता कुठे महापालिकेचा कारभार सुरू झाला असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. लातूर शहर ठप्प झाले आहे, दहा दिवसापासून पाणी नाही, आज आले तर ते दूषित आहे. महापालिका सार्वजनिक वाहतुक असलेल्या बस बंद करायला निघाले आहे. याचाच अर्थ लातूर ठप्प झाले आहे, अशी टीका करत भाजपा शहर-जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी काँग्रेसविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
- महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या रवींद्र एरंडेला ४ दिवसांची पोलीस कोठडी
- नराधम रवींद्र एरंडेला न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी
- उद्योजक आणि NGO संस्थाचालक रवींद्र एरंडेने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं तपासात समोर
- पीडित महिलांचे जबाब, हार्ड डिस्कमधील डेटाचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी पोलिसांनी मागितली होती एरंडेची पोलीस कोठडी
- सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने एरंडेला सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अखेर त्रिभाजन झाले आहे. त्रिभाजन संदर्भातले अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जारी करण्यात आल्या आहेत. जत आणि कवठेमहांकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आत वेगळया होणार आहेत. तर अधिसूचना जारी होताच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे सांगली कृषी उत्पन्न समितीवर आता प्रशासक राज येणार आहे.
राज्यामध्ये नावाजलेल्या पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावा यांच्या गैरवर्तन, भ्रष्ट्राचार तसेच गैरकृत्या विरोधात आज नाशिकच्या मालेगावमध्ये पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरुंच्या राजिनाम्याची मागणी करत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
नांदेड शहरातील श्रीनगर भागात आज सकाळी सोनु कल्याणकर या 35 वर्षीय तरुणाचा खून झाला. चार आरोपीने मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. सोनु कल्याणकर याच्या चार मारेकऱ्यांना काही तासात पोलीसांनी अटक केली आहे.
बारामतीची जागा बिनविरोध झाली असती तर बर झालं असतं असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. अजित पवारांचं अचानक निधन झाल्याने कुठल्याही मोठ्या व्यक्तीचं अशा रीतीने निधन झाल्यास पोट निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले जातात. मात्र बारामती मध्ये इतर पक्षांनी सोडून फक्त काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार दिला असून हे त्या पक्षाचे धोरण असल्याचे म्हणत बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणे अपेक्षित होते असे एकनाथ खडसे म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याची लढाई इस्लामाच्या विरोधात होती. म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम होती हे सर्वांना माहिती आहे. मात्र काही आपल्यातले दीड शहाणे म्हणतात की महाराजांच्या सैनिकांमध्ये मुस्लिम होते. मात्र हे त्यांच्या आबानी पाकिस्तानमधून येऊन त्यांना सांगितलंय का? तसं खरंच असतं तर काही लिखित पुरावे सापडले असते. औरंग्या आणि टिपूने असंख्य हिंदू मंदिरं तोडली. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब मारत होता तेव्हा त्यानं स्वराज्य मागितले नाही, दौलत मागितले नाही फक्त तुमचा धर्म बदला असं सांगितलं. त्यामुळे हे स्पष्ट होतं की स्वराज्याची लढाई ही केवळ इस्लामच्या विरोधातच होती.
पुण्यातील धानोरी येथील भैरवनगर परिसरात अखिल भैरवनगर हिंदु संमेलन समितीच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला भाजप मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. राणे यांनी, मोदीजींच्या काळात आता गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी सातत्याने खान यांचे चित्रपट यायचे. खान यांच्या शिवाय दुसरे चित्रपटात येत नव्हते. मात्र आता, छावा, धुरंदर सारखे चित्रपट येत असून आता रणवीर कपूर देखील रामायण सारखा चित्रपट करत आहे. नाही तर पूर्वी शाहरुख खान हा चित्रपटामध्ये चार बटन खोलून स्क्रीनवर यायचा आणि शाहरुख खानचे चित्रपट पाहून लव जिहादच्या केसस वाढायच्या असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं.
जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस. या निमित्ताने राज्य आणि देशभरात भाजपाची कार्यालय, मंत्री, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी भाजपाचा झेंडा फडकवत स्थापना दिवस साजरा करत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात भाजपाबरोबर राज्याच्या सत्तेत आणि महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगलेले शिवसेनेने पक्ष फुटीनंतर भाजपावर जळजळीत टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाला स्थापना दिनीच टोला लगावला आहे.
राज्य शासनाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील साडे 5000 हजारांहून अधिक प्राध्यापक पदे लवकरच भरली जाणार आहेत. ही पदे १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारित भरली जातील. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना विषयवार पदांचा तपशील कळवण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांकडून रोस्टर तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.
करुणा मुंडे बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत. करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या. बारामतीतील शेतकरी सामान्य माणसाच्या विकासासाठी निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
खरातच्या अडचणी आता आणखीन वाढणार आहे. खरातच्या प्रकरणाची सूत्र आता थेट ईडीनं हातात घेतलीत. खरातनं जमावलेल्या अफाट संपत्तीचा आणि आर्थिक गैरव्यवहारांचा तपास कऱण्यासाठी EDनं मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रंही ताब्यात घेतलीत. ईडीच्या एन्ट्रीनं आता अनेकांचे धाबे दणाणलेत.
नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढत असून, शिंदे गटाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांची पहाटे मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञातांनी हल्ला करून हत्या केली. तीन दिवसांत पाच खुनांनी शहर हादरले आहे. या घटनेवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
अशोक खरात प्रकरणात बीडमधील एका महिला पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा आरोप समोर आला आहे. निनावी पत्रातून धक्कादायक माहिती उघड झाल्याचे सांगितले जाते. काही महिला त्याला मदत करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केली आहे.
राज्यातील विविध विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिली असून, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढले आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात प्रफुल पटेल म्हणाले, 'माझी सर्व पक्षांना विनम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या सुनेत्रावहिनींना बिनविरोध निवडून द्यावे. हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल.'
काँग्रेस पक्षाला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल तर त्यांनी निवडणूक लढल्यास हरकत नाही. राहुरी आणि बारामती निवडणुका वेगवेगळ्या आहेत.काँग्रेसने राहुरी निवडणूक लढली तरी चालेल मात्र बारामतीची निवडणूक वेगळी असल्याने त्यांनी त्या ठिकाणी विचार करणे आवश्यक आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
लक्ष्मण हाकेंची बारामती निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. हाकेंनी माघार घ्यावी यासाठी दत्ता भरणेंनी हाकेंची भेट घेत त्यांना विनंती केली होती. अखेर हाकेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी सकाळीच काटेवाडीत अजित पवारांच्या आईंचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर अजितदादांच्या स्मृतीस्थळी जात त्यांनी अभिवादन केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता.आहे
राज्यात पोटनिवडणूक बिनविरोध निवडणुका होत होत्या. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी हा पॅटर्न मोडला. त्यांना आम्ही विनंती केली होती की उमेदवार देऊ नका. मात्र, त्यांनी तेव्हा उमेदवार दिले. आणि आता बिनविरोधसाठी आवाहन करतायेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
भिगवन प्रकरात मुलीच्या जबाबानंतर जहीर शेखसह चौघांविरोधात अपहरण आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी तरुणीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचे जबाब दिला होता. मात्र आता मुलीने तिचा जबाब बदलला आहे.
पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बारामतीमध्ये आकाश मोरे यांनी काँग्रेसकडून उमदेवारी दाखल केली आहे. तर, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही हे स्पष्ट झाले नाही.
ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे रामराव वडकुते आणि माया ईवनाते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे हे सर्व नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य आज खासदारकीची शपथ घेणार आहेत. तर दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे 9 एप्रिलला शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते, ज्योती वाघमारे या नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी अभिवादन करणार.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दुपारी १२.३० वाजता त्या आपला अर्ज दाखल करतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.