

जप्त मालमत्तेची किंमत सुमारे 16.95 कोटी
प्रकरण 122 कोटींच्या बँक निधी अपहाराशी संबंधित
EOW मुंबईने दाखल केलेल्या FIR वरून ED ने सुरू केला तपास
NICB बँकेचे माजी GM हितेश मेहता यांची मुख्य भूमिका उघड
अकाउंटिंग सिस्टीममध्ये फेरफार करून पैसे वळवल्याचा आरोप
हिरेन भानू यांच्या सांगण्यावरून गैरव्यवहार झाल्याचा ED चा दावा
गौरी भानू यांनाही गैरव्यवहारातील पैशांचा लाभ झाल्याचा आरोप
हिरेन भानू दाम्पत्याने किमान 26 कोटींचा फायदा घेतल्याचा संशय
परदेशातील कंपन्यांमार्फत पैसे वळवल्याचा तपासात खुलासा
आरोपींविरोधात आरोपपत्र, अजामीनपात्र वॉरंट जारी
आरोपी सध्या परदेशात असून तपासात सहकार्य नाही
बँक व ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा ED चा आरोप
Marathwada News : एप्रिल महिना उजाडला आहे, मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी, गारपीट झाली असली तरी अजूनही शेतीसाठी पाण्याची गरज लक्षात घेता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानूसार जायकवाडी धरणातून शेतीसाठी चार समान आवर्तन देण्याचा तसेच पिण्यासाठी धरणातील पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात अवैध बांधकामांची पाहणी करण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांचा स्थानिक पत्रकारांशी वाद झाल्याची घटना आज घडली.
माहितीनुसार, सोमय्या पाहणी करत असताना काही पत्रकार तेथे व्हिडिओ शूटिंग करत होते. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या वादादरम्यान सोमय्या यांनी काही पत्रकारांचे मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच “येथे कोणते पत्रकार आहेत त्यांची ओळखपत्र तपासा, येथे अतिरेकी घुसले आहेत” असे वक्तव्य त्यांनी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल (८ एप्रिल, २०२६ रोजी) प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम तर सोलापूर जिल्हातील आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत.
पुण्यात बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांचे विश्वासू आणि खांदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दिलीप मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक करत चर्चा केली आहे. यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जगताप यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत आगामी निवडणुका, खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती यावर चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान, या घडामोडींमुळे दिलीप मोहिते पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला असून, अजित पवार गटासाठी ही मोठी राजकीय धक्का ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जालना महापालिकेच्या आयुक्तांचे सहा महिन्यापासून असलेले रिक्त पद, जिल्हाधिकाऱ्यांकडे या पदाचा असलेला अतिरिक्त कारभार यामुळे विकासकामाला खीळ बसल्याची टीका होत होती. यावर प्रशासकीय आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत सरकारने शहर व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या कामांचा आढावा घेतला जात नाहीच, पण पुण्यात भयंकर पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली तरीही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाराजी व्यक्त करत पुण्याकडे लक्ष द्या अशी मागणी केली आहे.
पुण्यातील सायली सुर्वे हिचे प्रकरण लव्ह जिदाहदाच प्रकार असून, तिचा अतोनात छळ केला आहे. तिच्या कुटुंबियांना, नातेवाइकांचा छळ आरोपी आतिफ तासे याने केला आहे. सायलीने या प्रकरणात अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली. पण तिला संरक्षण मिळाले नाही. यामध्ये पोलिसांचीही चूक असल्याची टीका राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरुपानंद विश्वनाथ देशमुख यांनी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरपंच पदाची निवड बिनविरोध करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. गेल्या निवडणुकीत सरपंच संतोष देशमुख यांच्या विरोधात नऊ मतांनी पराभूत झालेले स्वरुपानंद देशमुख यांनी निवडणूक लढविणार आहेत.
हिंदू जनआक्रोश मोर्चात जाण्याआधी आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवले आहे. पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना पुणे पोलिसांकडून विनंती करण्यात येत आहे. त्यांना खडी मशीन चौकात येण्यापूर्वीच पोलिसांनी अडवले आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे. बदली तत्काळ मागे घ्यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आत्महत्यांची चौकशी थेट तालुका स्तरावर केली जाणार आहे. तालुका समितीकडून सखोल छाननी करून अहवाल जिल्हा समितीकडे पाठवले जातील. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेग येऊन शेतकरी कुटुंबांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झालीय. तर तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेणार असून त्यानंतर 24 तासाच्या आत पुन्हा त्याला कोर्टात हजर करणार आहेत.
हसन मुश्रीफ आणि माझ्यातले वैर संपलं आहे आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ते संपवलं आहे आणि येत्या काळात देखील आम्ही सोबत काम करू, असं वक्तव्य समरजित घाटगे यांनी केलं आहे.
माढा तालुक्यातील मोडनिंब मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्रीत उभारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत समोर नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. त्याच्या कायदेशीर बाबींचा गोंधळ सुरु असतानाच अचानकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच परिसरात उभा केला गेला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत.
बारामती पोटनिवडणुकीसाठी तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. गुरुवारी (ता.9) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोण कोण माघार हे हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी तब्बल 55 उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याची आशा मावळली आहे. बारामती विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून सुनेत्रा पवार या शनिवारी नारळ कन्हेरीतील मंदिरात प्रचाराचा नारळ फोडतील.
संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे तयार करून सिमलेस वाहतूक व्यवस्था तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षात मुंबई महानगर क्षेत्रात दिल्लीपेक्षाही मोठे वाहतुकीचे जाळे निर्माण होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड येथे दिली. मिरा भाईंदरच्या दहिसर ते काशी गांव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या मेट्रोमुळे मिरा भाईंदरला मुंबईशी जोडण्याचे काम झाले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात आता इच्छा मृत्युपत्राचा ऐतिहासिक निर्णय लागू करण्यात आलाय. दुर्धर आजाराला तोंड देणाऱ्या व्यक्तींना इच्छा मृत्युपत्राला मान्यता देण्यात आलीये. सर्वोच्च न्यायालयानं इच्छा मृत्युपत्रांचे संरक्षक म्हणून महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषद किंवा नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली असून, मृत्युपत्राच्या नोंदणीसाठी स्वतंत्र संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे.
संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तुर्तास थांबला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अखेर आपण सध्या हल्ले करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.ट्रम्प यांनी यांनी जाहीर केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या आवाहनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने यशस्वी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.